Pune News : आगामी (Loksabha election 2024) लोकसभा निवडणुकांच्या धर्तीवर नागरिकांना केंद्रस्थानी ठेवत काही निर्णय घेतले जात असतानाच एका निर्णयामुळं मात्र काहीसा नाराजीचा सूर आळवला जात आहे. त्यातच ऐन (Summer Vacation) सुट्टीच्या तोंडावर हा निर्णय झाल्यामुळं आता सुट्टीला जायचं की वाढलेल्या खर्चाची चिंता करायची असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करू लागला आहे. कारण ठरतेय ती म्हणजे टोलच्या रकमेत करण्यात आलेली वाढ. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे सातारा महामार्गावरील (Pune To satara highway) खेड-शिवापुर टोलनाक्यावर एक एप्रिल पासुन सुमारे अडीच टक्क्यांनी वाढीव टोल वसुली करण्यात येणार आहे. ठेकदार टोल रोड प्रशासनामार्फत याबाबतचं पत्रक प्रसिध्द करण्यात आल्याची माहीती विभागीय प्रमुख अमित भाटिया यांनी दिली आहे. 


टोलच्या वाढीव रकमेनुसार कार, जीपसह हलक्या वाहनांसाठी टोलच्या दरात पाच रुपयांची वाढ होणार आहे. थोडक्यात आतापर्यंत घेण्यात येणारा 115 रुपये दर आता 120 रुपये होणार आहे. हलक्या व्यवसाईक वाहनांच्या टोल दरातही पाच रुपयांची वाढ होत असुन, या वाहनांना 185 ऐवजी 190 रुपये द्यावे लागणार आहेत. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : विदर्भात उष्णतेच्या झळा; साताऱ्यात पाऊस, राज्यातील हवामानात 48 तासांत मोठ्या बदलांची अपेक्षा


बस ट्रक साठी टोलच्या रकमेत दहा रुपयांची वाढ होणार असुन आता या वाहनांना 400 रुपये दर द्यावा लागणार आहे. जड वाहनांसाठी 415 रुपयांवरुन पाच रुपये वाढुन 420 रुपये होणार आहे. तर,  बरोबरच अवजड वाहनांसाठीच्या 615 रुपये टोल मध्ये 15 रुपयांची वाढ होणार असुन अवजड वाहनांना आता 630 रुपये टोल द्यावा लागणार आहे. जड आणि अवजड वाहनांच्या टोल रकमेमध्ये तुलनेनं जास्त वाढ झाली असल्याचं या आकडेवारीवरून लक्षात येतं. 


महाबळेश्वरपर्यंतचा प्रवास महागला... 


खे़ड- शिवापूर येथे असणाऱ्या टोलनाक्यावर चारचाकी खासगी वाहनांसाठीच्या टोलच्या रकमेत झालेल 5 रुपयांची वाढ अतिशय मोठी नसली तरीही (Mumbai To Mahabaleshwar) मुंबई ते महाबळेश्वर असा प्रवास विचारात घेतला तरीही या संपूर्ण प्रवासात येणारे एकूण टोलनाके पाहता इंधनासह आता या टोलसाठी येणारा सर्वसमावेशक खर्चही वाढला आहे ही महत्त्वाची बाब. थोडक्यात आता राज्यात भटकंतीसाठी निघताना फास्टॅगमध्ये जास्तीची रक्कम नक्की ठेवा.