किल्ले रायगडावर शिवसमाधीसमोर पिंडदान? व्हायरल व्हिडिओमुळे शिवप्रेमी संतापले
व्हायरल व्हिडिओमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट
Viral Video : किल्ले रायगडावर (Raigad Fort) शिवसमाधी समोर पिंडदान करण्यात आल्याचा Video व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे शिवप्रेमींमध्ये (ShivPremi) संतापाची लाट उसळली आहे. शनिवारी रायगडावर शाक्त पद्धतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला. त्यावेळी या कार्यक्रमाला आलेल्या शिवभक्तांनी हा प्रकार पाहिला आणि तिथं पिंडदान करणाऱ्या व्यक्तींना याचा जाब विचारला.
या व्हिडिओ ची झी 24 तास पुष्टी करत नाही. मात्र या प्रकाराने शिवभक्त संतापले आहेत. यापूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे पूजन शिवसमाधी समोर करण्याचा कथित प्रकार समोर आला होता.
व्हायरल व्हिडिओत काय?
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर पिंडदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा दावा या व्हिडिओत करण्यात आला आहे. शिवसमाधी जवळच्या एका कोपऱ्यात पिंडदानाचा कार्यक्रम सुरु होता. ही गोष्ट शिवप्रेमींना समजातच त्यांनी धाव घेत हा कार्यक्रम रोखला.
काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ पुस्तक पूजेचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.