Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर (Mumbai-Pune Express Way) लग्नाच्या वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात (Accident) झालाय. मुंबईकडे येणाऱ्या लेनवर हा अपघात झाल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. खोपोलीजवळ बोरघाटात कंटेनरने या खाजगी बसला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 18 जण जखमी झाले असून मिळालेल्या माहितीनुसार बस चालकाचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. अपपातस्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं असून मदतीसाठी आयआरबी, देवदूत , महामार्ग पोलिस , अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. अपघातातील 4 गंभीर जखमीना एमजीएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. तर 6 जखमींना खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचार चालू आहेत. 10 ते 12 किरकोळ जखमींना घटना स्थळावर प्राथमिक उपचार केले जात आहेत. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली असल्याने तीनही लेन वरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंटेनरने खाजगी बसला मागून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, बसच्या मागचा भागाचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात कंटेनरचाही मोठं नुकसान झालं आहे. ही बस लग्नाच्या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्गात गेली होती. तिथून कोल्हापूरमार्गे वाशिंदला परतत असताना पाठिमागून कंटेनरने धडक दिली.


सकाळच्या वेळेस झालेल्या अपघातामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. वाहतूक सुरु झाली असली तरी धिम्यागतीने सुरु आहे.