Mumbai rains: बाप्पा आगमन सोहळ्यात मुंबईत पावसाची साथ! `या` जिल्ह्यातही वरुणराजा कोसळणार
Maharashtra Rain : राज्याच्या अनेक भागात शुक्रवारपासून हलक्या आणि मध्यम पाऊस पडला आहे. अखेर एक महिन्याच्या ब्रेकनंतर विदर्भात पाऊस कोसळला आहे.
Maharashtra Weather Updates : गणरायाच्या (Ganeshotsav 2023) आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गौरी गणपतीसाठी कोकणाकडे जाण्यासाठी लोकांची लगबग सुरु असताना मुंबईत वरुणराजाने हजेरी लावली आहे. मोठे गणपती मंडळ आज गणरायाला जाऊन जात असताना वरुणदेवही सोहळ्यात सामील झाला आहे. मात्र अखेरच्या टप्प्यात बाप्पा आगमनासाठीच्या तयारीसाठी मार्केटमध्ये खरेदीसाठी गेलेल्या सर्वसामान्यांची तारांबळ उडाली आहे. पुढील 3 ते 4 तासांत नंदुरबार, धुळे नाशिक पालघर या भागांत अधूनमधून जोरदार पावसासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, असं ट्वीट के एस होसाळीकर यांनी केलं आहे.
मुंबईतील पावसाबद्दलही त्यांनी ट्वीट केलं आहे. (maharashtra rain intensity of rain will decrease today maharashtra on orange alert weather update)
महिन्याभराच्या विश्रांतीनंतर विदर्भावर वरुणराजा मेरहबान झाला आहे. विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार कमबँक केला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. दोन दिवसांपासून विदर्भातील नागपूर, भंडारा, अमरावती जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळतो. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका भंडारा जिल्ह्याला बसला आहे.
भंडारा पाऊस
भंडाऱ्यातील वैनगंगा नदिला आलेल्या पुरामुळे सर्वत्र हाहाकार माजलाय. बॅक वाटरच्या पाण्याने खमारी येथील नाला ओसंडून वाहू लागलाय. नाल्यावरुन पुराचे पाणी 3 फुटावरुन वाहू लागलंय. त्यामुळे करडी- भिलेवाड़ा मार्ग बंद झालाय. त्यामुळे तब्बल 15 गावांचा मुख्यालयाशी संपर्क तूटलाय.
जळगाव पाऊस
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. पावसामुळे निंबोल ऐनपुर गावाजवळील तापी नदीला पूर आल्याने या पुराचे पाणी निंबोल ऐनपुर गावातील अनेक घरात घुसलं. तसेच रावेर तालुक्यातील इतर गावांशी देखील संपर्क तुटलाय. मुसळधार पावसामुळे तापी नदीचे पाणी शेतात घुसल्याने शेतीचे देखील मोठे नुकसान झालंय.