Massive landslide: काल रात्रीपासून मुंबई-ठाण्यासह कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. लोकल तसेच एक्सप्रेस गाड्यांवर याचा परिणाम झालाय. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झालीय. रस्त्यांवरही पाणी साचलं असून नागरिकांचा खोळंबा झालाय. दरम्यान कुडाळ येथून एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंबेरी पुलाला भलेमोठे भगदाड पडल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा मार्ग बंद झालाय. काल दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका आंबेरी मार्गाला बसल्याचे पाहायला मिळाले. कुडाळ येथील माणगाव खोऱ्यातील आंबेरी पुलाला भलेमोठे भगदाड पडले. त्यानंतर आता हा मार्ग आता पूर्णतः बंद झाला आहे. 


नवीन बांधण्यात आलेला पुल अद्यापही वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाहीय. आंबेरी मार्गावरील माणगाव खोऱ्यातील तब्बल 27 गावांचा येण्याजाण्याचा मार्ग बंद झालाय. नव्याने बांधण्यात आलेला पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी येथील नागरिकांमधून होतेय.