Maharashtra Rain Updates : मागील  दोन ते तीन दिवसांपासून मुंबई आणि नवी मुंबई परिसरा पावसानं काहीशी विश्रांती घेतली होती. हवामान विभागानं विदर्भासह कोकणात वर्तवलेल्या इशाऱ्याप्रमाणं पावसाची हजेरी पाहायला मिळाली. असं असतानाच राज्याच्या उर्वरित भागात आता हा वरुणराजा पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे वेधशाळेचे महासंचाक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढचे चार ते पाच दिवस पावसाची हजेरी असणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार, तर मराठवाडा आणि इतर काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.




दरम्यान पावसाच्या या दिवसांमध्ये पुढील तीन ते चार दिवसांमध्ये एखाद्या नजीकच्या ठिकाणी या मान्सूनचा आनंद घेण्यासाठी तुम्ही जाणार असाल, तर ही परवणीच ठरणार आहे. माळशेज घाट, इगतपुरी, पाचगणीसह कर्जत आणि नजीकच्या लहानमोठ्या डोंगररांगांवरही सध्या हिरवळ बहरली आहे. शिवाय अनेक लहानमोठे धबधबे प्रवाहित झाल्यामुळं तिथंही पर्यटकांचा ओघ वाढताना दिसत आहे. 


हेसुद्धा वाचा : Chandrayaan-3 Launch Countdown Live: चार वर्षांनंतर स्वप्नपूर्तीच्या दिशेनं पुन्हा झेप; चांद्रयान 3 चं उड्डाण इथं पाहा लाईव्ह 


महाराष्ट्राच्या विविध भागात पावसाची हजेरी 


नाशिक शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील दोन दिवसांपासून कमी- अधित  प्रमाणात पाऊस पडत होता. मात्र  जोरदार कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. नाशिकमधून सकाळपासूनच  ढगाळ वातावरण होतं. या पावसाने नाशिककरांना दिलासा दिला आहे. तिथे जळगावला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. रावेरसह विवरा आणि खिरोदा परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. या दोन्ही गावात पूरस्थिती निर्माण झालीय. 


तापी आणि पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सध्या हतनूर धरणाचे 10 दरवाजे 1 मीमी ने उघडण्यात आले असून हतनूर धरण क्षेत्रातील ग्रामस्थांना धोक्याची सूचना देण्यात आलीये असून कुणीही तापी नदी पात्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.