Chandrayaan-3 Launch Countdown Live: चांद्रयान 3 चंद्राच्या दिशेनं झेपावताच संपूर्ण देशात एकच जल्लोष

Chandrayaan-3 Launch Countdown Live: एका ऐतिहासिक उड्डाणासाठी इस्रो सज्ज झालीय. आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3  अंतराळात झेप घेणार आहे.

Chandrayaan-3 Launch Countdown Live: चांद्रयान 3 चंद्राच्या दिशेनं झेपावताच संपूर्ण देशात एकच जल्लोष

Chandrayaan-3 Launch Countdown Live: भारतातून अतिशय ऐतिहासिक अशा चांद्रयान मोहिमेतील अत्यंत महत्त्वाचा दिवस आज असून, अखेर असंख्य महत्त्वाकांक्षांच्या जोडीनं चांद्रयान 3 अवकाशात झेपावणार आहे. त्यामुळं फक्त भारतच नव्हे, तर संपूर्ण अंतराळ क्षेत्राची या मोहिमेवर नजर असणार आहे. इथं आपण या मोहिमेतील सविस्तर माहिती आणि थेट प्रक्षेपण पाहू शकणार आहोत. 

 

14 Jul 2023, 14:57 वाजता

Chandrayaan-3 Launch Countdown Live: चांद्रयान 3 चं यशस्वी प्रक्षेपण होताच शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचा उत्साह शिगेला... पाहा त्या क्षणाची दृश्य. 

14 Jul 2023, 14:51 वाजता

Chandrayaan-3 Launch Countdown Live: चांद्रयान 3 अवकाशाच्या दिशेनं झेपावताच इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी चांद्रयानाच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देत या मोहिमेत सहभागी असणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांची ओळख करून दिली. यावेळी चांद्रयान 3 मोहिमेच्या प्रमुखपदी मोहन कुमार यांच्या प्रयत्नांचं सोमनाथ यांनी कौतुक केलं. 

 

14 Jul 2023, 14:41 वाजता

Chandrayaan-3 Launch Countdown Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून जागतिक स्तरावरील अनेक विद्वान आणि अभ्यासकांनी या मोहिमेवर लक्ष केंद्रीत करत असतानाच अखेर शुक्रवार 14 जुलै 2023 ला Chandrayaan 3 अवकाशात झेपावलं आणि या यानासह भारताच्या असंख्य महत्त्वाकांक्षाही झेपावल्या. 

14 Jul 2023, 14:16 वाजता

Chandrayaan-3 Launch Countdown Live: चांद्रयान उड्डाणासाठी उरली फक्त काही मिनिटं, पाहा इस्त्रोमध्ये नेमकं कसं वातावरण आहे... 

14 Jul 2023, 13:41 वाजता

Chandrayaan-3 Launch Countdown Live:  कुठे पाहता येणार चांद्रयानाचं लाई उड्डाण? यासाठी इस्त्रोनं एक लिंक जारी केली आहे. जिथं तुम्ही घरबसल्या प्रक्षेपण स्थळावरील दृश्य आणि उत्सुकता पाहू शकता 

14 Jul 2023, 12:42 वाजता

Chandrayaan-3 Launch Countdown Live:  इस्त्रोच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देत ही मोहिम एक मैलाचा दगड ठरेल असं ते म्हणाले. 

14 Jul 2023, 12:07 वाजता

Chandrayaan-3 Launch Countdown Live:  इस्त्रोतील माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांनी चांद्रयान 3 मोहिम भारतासाठी बाजी पलटणालं पाऊल ठरू शकते अशी प्रतिक्रिया दिली आहे. चार वर्षांनंकर भारत पुन्हा या मोहिमेत प्रयत्नशी असून मोहिम यशस्वी झाल्यास हा ऐतिहासिक टप्पा असेल असं ते म्हणाले. 

14 Jul 2023, 11:25 वाजता

Chandrayan 3 Launch: आज भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. संपूर्ण जगाचं लक्ष आजा भारताकडे असणार आहे. भारतातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून (Satish Dhavan Space Centre) दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3 चं लाँचिंग होणार आहे. मोहिमेसाठी 615 कोटी खर्च करण्यात आले आहेत. जवळपास 50 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडिग करेल. चांद्रयान-3 च्या लँडिगची जबाबदारी महिला शास्त्रज्ञ ऋतु करिधाल (Ritu Karidhal) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ऋतु करिधाल चांद्रयान 3 च्या मिशन डायरेक्टर म्हणून भूमिका निभावत आहेत. 

बातमीच्या लिंकसाठी येथे क्लिक करा 

14 Jul 2023, 11:04 वाजता

Chandrayaan-3 Launch Countdown Live: चांद्रयान मोहिमेत महिला महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसणार आहेत. तब्बल 54 महिला इंजिनिअर आणि टेक्निशिअननी या मोहिमेक मोलाचं योगदान दिलं आहे. चांद्रयान 2 प्रमाणंच चांद्रयान 3 मध्येसुद्धा सॉफ्ट लँडिंग एक महत्त्वाचं आवाहन आहे. त्यामुळं या मोहिमेकडे सर्वांचं लक्ष आहे.