कोरोनाच्या रुग्णांमध्ये आज मोठी वाढ, राज्यात इतक्या जणांना कोरोनाची लागण
राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यामुळे अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
मुंबई : आज राज्यात तब्बल 18,466 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झालीये. राज्यात आज 20 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१% एवढा आहे. तर राज्यात 75 ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण वाढले आहेत.
मुंबईत 40, ठाण्यात 9, पुण्यात 8, पनवेलमध्ये 5, नागपूर आणि कोल्हापूर मध्ये प्रत्येकी 3, पिंपरी चिंचवडमध्ये 2, भिवंडी निजामपूर मनपा, उल्हासनगर, सातारा, अमरावती आणि नवी मुंबईत प्रत्येकी 1 ओमायक्रॉनचा रुग्ण वाढला आहे.
आज एकट्या मुंबईत 10 हजार 860 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर पुण्यात 1104 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
पिंपरी चिंचवडात आज दिवसभरात 350 नवे कोरोना रुग्ण आढळले असून एक नवा ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला आहे.
रायगड जिल्ह्यात दिवसभरात 702 नवे रुग्ण वाढले असून पनवेल शहरात सर्वाधिक 521 रुगणांची नोंद झालीये. तर दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झालाय.
नवी मुंबईत एका दिवसात 1072 कोरोना रुग्ण वाढलेत. गेल्या काही महिन्यांतील सर्वाधिक रुग्ण संख्या आहे.
कल्याण-डोंबिवलीत 24 तासात 422 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.