मुंबई: राज्यात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाच्या २२०८४ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर उपचार सुरु असलेल्या ३९१ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता १०, ३७, ७६५ वर जाऊन पोहोचला आहे. यापैकी २,७९,७६८ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ७,२८,५१२ लोकांना कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत कोरोनामुळे राज्यातील २९११५ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना लस संदर्भात चांगली बातमी, ऑक्सफर्ड आणि 'कोव्हॅक्स'ला मिळतेय यश



आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील करोना मृत्यूदर सध्या २.८१ टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत ५१ लाख ६४ हजार ८४० चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील १० लाख ३७ हजार ७६५ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय, आज दिवसभरात  १३,४८९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.०२ टक्के इतके झाले आहे. 


पुण्यात ऑक्सिजन टँकर्सवर लागणार सायरन


आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५१,६४,८४० प्रयोगशाळेतील नमुन्यांपैकी १०,३७,७६५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६,५२,९५५ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३८,२७५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.


ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर समित्यांची स्थापना
कोरोनाच्या काळात गंभीर रुग्णांना उपचारासाठी वेळेवर ऑक्सिजन मिळावा तसेच ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा याच्या नियंत्रणासाठी जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावर समित्यांची स्थापना करतानाच जिल्हास्तरावर कंट्रोल रूम सुरू करण्यात आले आहेत. राज्याची ऑक्सिजनची  गरज ४०० मेट्रिक  टन एवढी  असून  उत्पादन क्षमता १०८१ मेट्रिक टन आहे. सध्या राज्यात ऑक्सिजनचे जंबो सिलिंडर १७ हजार ७५३, बी टाईप सिलिंडर- १५४७, डयुरा सिलिंडर- २३०, लिक्विड क्रायोजनिक ऑक्सिजन टँक्स १४ असून आणखी १६ ठिकाणी काम सुरु आहे.