धक्कादायक, मुंबईला येणाऱ्या धावत्या रेल्वे एक्स्प्रेसमध्ये दरोडा, महिलेवर सामूहिक बलात्कार
Lucknow-Mumbai Pushpak Express : धक्कादायक बातमी. धावत्या लखनऊ - मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये एका टोळीने दरोडा टाकला. (Robbery on Pushpak Express from Lucknow-Mumbai)
कल्याण : Lucknow-Mumbai Pushpak Express : धक्कादायक बातमी. धावत्या लखनऊ - मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये एका टोळीने दरोडा टाकला. (Robbery on Pushpak Express) त्यांनी अनेक प्रवाशांची लुटमार केली. यावेळी दरोडेखोरांनी एका 20 वर्षीय महिलेवर बलात्कारही केला. शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना इगतपुरी स्थानकादरम्यान घडली. याप्रकरणी कल्याण जीआरपीने गुन्हा दाखल केला. पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. रेल्वे पोलिसांनी आधी दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री उशिरा आणखी दोघांना अटक केली. (Maharashtra - Gang rape in Lucknow-Mumbai bound Pushpak Express)
लखनऊ - मुंबई पुष्पक एक्स्प्रेस इगतपुरी स्थानकादरम्यान येत असताना हा दरोडा टाकण्यात आहे. 7 ते 8 दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला आहे. दरोडेखोरांनी 15 ते 20 प्रवाशांना लुटले आहे. तसेच दरोडेखोरांकडून 20 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संताप आणणारी घटना घडली आहे. धावत्या लखनऊ - मुंबई पुष्पक एक्स्प्रेस एका महिलेवर बलात्कार केला. ही घटना इगतपुरी - कसारा स्थानकादरम्यान घडली. कल्याण जीआरपीने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांच्या ताब्यात घेतले असून अधिक चौकशी करत आहेत.
रेल्वे पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, लखनऊ - मुंबई पुष्पक एक्स्प्रेस शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता इगतपुरी स्थानकावरून निघाली. त्यावेळी सात ते आठ लोक रेल्वे बोगीत चढले. काहींच्या हातात शस्त्र होते. त्यांनी प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सुमारे 20 प्रवाशांना लुटले आहे. त्याचवेळी विरोध करणाऱ्या प्रवाशांना दरोडेखोरांनी मारहाण केली. यात पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
लखनऊ-मुंबईला जाणारी पुष्पक एक्सप्रेस कसारा स्टेशनवर पोहोचेपर्यंत लूट आणि बलात्कार करण्यात आला. या घटना सुमारे अर्धा तास चालू होती. दरोडेखोरांनी प्रवाशांना धमकावल्यानंतर प्रवाशांनी कसारा स्टेशनवर गोंधळ घातला. यावेळी रेल्वे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली . त्यानंतर रात्री उशिरा आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी चार जणांचा शोध घेण्यात येत आहे. रेल्वे पोलीस आरोपींची पार्श्वभूमीचा शोध घेत आहेत आणि त्यांनी यापूर्वी असे गुन्हे केले आहेत का, याची चौकशी करत आहेत.