मुंबई : महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली. दहावीच्या बोर्ड परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.  (Maharashtra SSC Result 2021 LIVE : 10th Result Update )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे  हा निकाल तयार करण्यात आला आहे.  १०वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी एक वाजता पाहता येणार आहे. अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे. 99.95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 


पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे 


99.96% विद्यार्थिनी उत्तीर्ण 


99.94 % विद्यार्थी उत्तीर्ण


नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी 


कोकण विभागाचा निकाल 100 टक्के 


दहावीच्या 27 विषयांचा निकाल 100 टक्के 


22383 शाळांचा निकाल 100 टक्के 


82362 विद्यार्थ्यांना 90 टक्के गुण  


957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण 


दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97 टक्के गुण 


प्रथमच कोरोना महामारी संसर्गामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. परिणामी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन त्यांच्या वर्षभरातील तसेच आधीच्या वर्षाच्या कामगिरीच्या आधारे करण्यात आले. अकरावी प्रवेशांसाठी ऐच्छिक सीईटी घेतली जाणार आहे.


दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा रद्द करण्यात आली. मंडळाच्या इतिहासात प्रथमच अशा पद्धतीने दहावीची संपूर्ण परीक्षाच रद्द करण्यात आली. दहावीच्या परीक्षेसाठी यंदा एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ९ लाख ९ हजार ९३१ विद्यार्थी तर ७ लाख ४८ हजार ६९३ विद्यार्थिनी होत्या.


विद्यार्थी कोठे आणि कसा पाहणार दहावीचा निकाल?


http://result.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतचे सविस्तर परिपत्रक जारी केले आहे. सन २०२१ च्या दहावीच्या परीक्षेला ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यांचे गुण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. निकालाची प्रिंटही विद्यार्थ्यांना घेता येईल. यंदा करोनामुळे ही परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे निकाल कसा लागणार याची सर्वांना उत्सुकता आहे.  विद्यार्थी कोठे पाहू शकणार निकाल?  http://result.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.