Rajesh Tope | `....तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील`, आरोग्यमंत्र्यांचा इशारा
गर्दी अशीच वाढत राहिली तर दारुची दुकानंही (Wine Shop) बंद करावी लागतील असा सूचक इशारा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Maharashtra State Health Minister Rajesh Tope) यांनी दिलाय.
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा (Maharashtra Corona ) वाढता संसर्ग पाहता नवी नियमावली जाहीर करण्यात आली. या नियमावलीनुसार नवे निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंधांची अंमलबजावणी आज रात्रीपासून करण्यात येणार आहे. मात्र निर्बंधांनंतरही लोकं बेजबाब'दारु'ने वागत आहे. दारुसाठी वाईन शॉपवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. वाईन शॉपवर वाढत्या गर्दी वरुन राजेश टोपे सतर्क झाले आहेत. ही गर्दी अशीच सुरु राहिली तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील, अशा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. (maharashtra state health minister rajesh tope warnded if there is a crowd liquor shops will have to be closed in state)
काय म्हणाले आरोग्यमंत्री?
"कोरोना रूग्णांची संख्या वाढतेय. मात्र अजूनही गर्दी कमी होतांना दिसत नाही. ही गर्दी अशीच वाढत राहिली तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील", असा सूचक इशारा टोपे यांनी दिला. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.
केव्हापर्यंत निर्बंध लावणार नाही?
"राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढून हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडत नाही, तोपर्यंत आणखी नवे निर्बंध लावणार नाही", असंही आरोग्यमंत्र्यांनी नमूद केलं.
धार्मिक स्थळांबाबत काय म्हणाले?
आरोग्यमंत्र्यांनी दारुची दुकानं बंद करण्यासह धार्मिक स्थळांबाबतही प्रतिक्रिया दिली. "धार्मिक स्थळांमध्येही गर्दी होत असेल तर त्याबाबतही टप्प्याटप्यानं निर्णय घेण्यात येईल", असं टोपेंनी यावेळेस नमूद केलं.
या व्यावसायिकांना मोठा दिलासा
राज्य सरकारने जिम आणि ब्युटी पार्लरसाठी असलेले निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांसाठी काहीसा धीर नक्कीच मिळाला आहे. राज्य सरकारने कोरोना निर्बंधाचे सुधारित आदेश जारी केले आहेत. यामध्ये हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र यासह काही अटीही घालण्यात आल्या आहेत.
या सुधारित आदेशांनुसार, जिम आणि ब्युटी पार्लर 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र ब्यूटी सलूनमध्ये मास्क काढून कराव्या लागणाऱ्या एक्टिव्हिटी करता येणार नाहीत. म्हणजेच उदाहरण म्हणून तुम्हाला दाढी करायची असेल, तर तुम्हाला ती करता येणार नाही. कारण दाढी करण्यासाठी मास्क काढावा लागतो.