देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई : तुमच्या आमच्या लाडक्या लाल परीने अर्थात एसटीने (MSRTC) कोरोनाच्या पहिल्या लाटेत (Corona) बाहेरगावी अडकलेल्यांना राज्यात आणण्यासाठी मोठी भूमिका बजावली. इतकच नाही, तर लोकल रेल्वे सेवा बंद असल्याने अनेक महिने मुंबईतही सेवा दिली. कोरोनाला रोखण्यासाठी एसटी महामंडळानं देखील कंबर कसलीय. एसटीला आतून आणि बाहेरून विशिष्ट प्रकराची कोटिंग केली जाणारंय. ही कोटिंग म्हणजे प्रवाशांचं सुरक्षा कवच असेल. लालपरीवर नेमका कोणता प्रयोग केला जातोय, हे आपण जाणून घेणार आहोत. (Maharashtra State road transport Corporation has decided to apply interior coating in all buses to prevent corona)
 
एसटी बस होणार कोरोनामुक्त ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संशोधकांनी कोरोनाची तिसरी लाट तोंडावर असल्याचा इशारा दिलाय. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. त्यात एसटी महामंडळही देखील मागे राहिलेलं नाही. कोरोना रोखण्यासाठी एसटी महामंडळानं सर्व बसेसना आंतर्बाह्य कोटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. इतकंच नाही तर या कोटिंगमुळे खरंच कोरोना विषाणू मरतो का? हे जाणून घेण्यासाठी दोन खासगी लॅबची मदत घेतली जाणार आहे.



महामंडळाच्या निर्णयाननुसार कोरोना रोखण्यासाठी सर्व बसेसना अँटी मायक्रोबायल केमिकल कोटिंग केलं जाणारं आहे. कोटिंगनंतर मानवी स्वॅबच्या धर्तीवर या एसटी गाड्यांची देखील तपासणी करण्यात येईल. दोन खासगी लॅबमार्फत ही तपासणी करण्यात येईल. त्याद्वारे हे कोटिंग कोरोनाला रोखण्यासाठी किती परिणामकारक आहे याचा अभ्यास करण्यात येईल. अहवाल निगेटीव्ह आल्यास संबंधित कंपन्यांना मोफत कोटिंग करून देणं बंधनकारक असेल.


कोरोना काळात लाल परीनं सामान्यांना मोठा आधार दिलाय. स्वत:चा जीव धोक्यात घालून एसटी महामंडळाचे कोरोना वॉरिअर कर्मचारी अविरत सेवा देतायेत. त्यामुळं लाल परीच्या आणि पर्यायानं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटी महामंडळांनं घेतलेला निर्णय स्वागतार्हच म्हणावा लागेल.