Maharashtra Teachers Recruitment: राज्यातील शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. शासनाच्या शिक्षक भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त सापडला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून शिक्षक भरतीची आतुरता आता संपणार 


20 हजार जागांसाठी जाहिरात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना 20 हजारांहून अधिक जागांच्या जाहिराती पाहण्यास मिळणार आहेत. आज  दुपारनंतर ही जाहिरात दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या सुमारे 1 हजार खासगी शिक्षण संस्थांमधील 20 हजारांहून अधिक जागांसाठीच्या जाहिराती आज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 


इंजिनीअरिंगमध्ये मराठी सक्तीची, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय


मुलाखत न घेता नियुक्त्या 


शिक्षक भरती अंतर्गत तब्बल 16 हजार 500 जागांवर मुलाखती न घेता नियुक्ती केली जाणार आहे. उर्वरित जागांवर मुलाखती घेऊन नियुक्त केल्या जातील, असे सांगण्यात आले आहे. 


या शिक्षक भरती अंतर्गत जिल्हा परिषदेसोबतच खासगी शिक्षण संस्थेच्या जागांवरसुद्धा पात्र उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 


12th Board Exams In Controversy | बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, परीक्षांसाठीचं साहित्य बोर्डाकडून घेण्यास नकार