Maharashtra : या शहरात आली कोरोनाची तिसरी लाट, मंत्री म्हणाले - लवकरच निर्बंधाची घोषणा
Coronavirus : भारतात कोरोनाचा (Coronavirus in India) संसर्ग सातत्याने वाढत आहे आणि दरम्यानच्या काळात कोविड-19ची तिसरी लाट (Covid-19 3rd Wave) महाराष्ट्रातील नागपूरमध्ये आली आहे.
नागपूर : Coronavirus : भारतात कोरोनाचा (Coronavirus in India) संसर्ग सातत्याने वाढत आहे आणि दरम्यानच्या काळात कोविड-19ची तिसरी लाट (Covid-19 3rd Wave) महाराष्ट्रातील नागपूरमध्ये आली आहे. ही माहिती राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. त्यांनी त्याबाबचे संकेत दिले आहेत की, स्थानिक प्रशासन संक्रमणाची गती थांबवण्यासाठी लवकरच निर्बंध जाहीर करू शकते. (Maharashtra: Third wave of corona in Nagpur) दरम्यान, अद्याप तरी नागपूरसह महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्याबाबत चर्चा नाही. परिस्थिवर लक्ष ठेऊन आहोत, असे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणालेत. तर नागपूरमध्ये विकेन्ड लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिला. त्यामुळे काँग्रेसच्याच मंत्र्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसुन येते आहे.
नागपुरात तिसऱ्या लाट : मंत्री नितीन राऊत
खरे तर, कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी नुकतीच अधिकाऱ्यांसोबत एक आढावा बैठक घेतली, ज्यात महसूल, पोलीस आणि आरोग्य यासह अनेक सरकारी विभागांचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर नितीन राऊत म्हणाले, 'कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेने नागपुरात आपले पाय रोवले आहेत, कारण दोन दिवसांत दोन आकड्यांची रुग्णवाढ होऊ शकते. तशा प्रकारचा संसर्ग दिसून येत आहेत.'
2-3 दिवसांत निर्बंध लादले जाऊ शकतात
दरम्यान, मंत्री नितीन राऊत म्हणाले, 'अधिकाऱ्यांनी दोन ते तीन दिवसात तारीख निश्चित केल्यानंतर दुकाने आणि इतर आस्थापनांवर पुन्हा बंदी घातली जाईल. निर्बंध आवश्यक आहेत कारण लोकांचे प्राण वाचवणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे.
नागपुरातील कोरोना प्रकरणाची स्थिती
नागपुरात कोरोनाची 10 नवीन रुग्ण रविवारी नागपुरात नोंदवले गेले, तर सोमवारी शहरात 13 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. या आकडेवारीचा हवाला देत नितीन राऊत यांनी तिसऱ्या लाटेबाबत भाष्य केले. जिल्ह्यातील कोरोनाची प्रकरणे कमी झाल्यानंतर 17 ऑगस्ट रोजी निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्यात आले.
सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा वेग वाढला
नागपूर जिल्ह्यात ऑगस्टमध्ये कोविड -19ची केवळ 145 नवीन प्रकरणे नोंदली गेली, तर साथीमुळे केवळ दोन लोकांचा मृत्यू झाला. सप्टेंबर महिन्यात नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे आणि आतापर्यंत जिल्ह्यात 42 नवीन कोविड -19 प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सोमवारपर्यंत 56 सक्रिय प्रकरणे होती.