मुंबई : Maharashtra Covid Restrictions: चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि युरोपमध्ये कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत असल्याने जगात चिंता व्यक्त होत आहे. मात्र, भारतात कोरोनाचा धोका कमी झाल्याने कोरोनाचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. आता महाराष्ट्रात कोरोना निर्बंधातून मुक्तता मिळणार आहे. कोरोनाचे निर्बंध शिथील करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात 1 एप्रिलपासून कोरोना निर्बंध मुक्ती होणार असल्याची माहिती मिळत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांनाच खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. यामुळे मास्कचीही लवकरच सुटका होणार आहे. कोरोनाच्या साथीच्या दरम्यान राज्यात लागू करण्यात आलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे जनतेवर आलेले निर्बंधदेखील हटणार आहेत.


दरम्यान, चीनसह युरोपीयन देशात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे काळजी घेणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने कोरोनासंदर्भातील निर्बंध शिथील केले आहेत. मात्र, केंद्राने राज्यांना सूचना केल्या आहेत की, मास्क, सातत्याने साबणाने हात धुणे किंवा सॅनिटाईज करणे गरजेचे आहे. तसेच सोशल डिस्टन्स ठेवणेही गरजेचे आहे. त्यामुळे जरी निर्बंध शिथील झाले तरी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.