Maharashtra Tourism: जानेवारी महिना जवळपास संपत आला आहे. फेब्रुवारी महिना आणि गोड गुलाबी थंडी अशा अल्हाददायक वातावरणात पर्यटकांना शांत, रम्य वातावरण्यात फिरायला जाण्याची ओढ असते. सुट्टीच्या दिवसांत महाराष्ट्रातील जवळपास सर्वच हिल स्टेशन गर्दीने खचाखच भरलेली असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एका शांत व पर्यटकांना फारसे माहित नसलेल्या हिल स्टेशनविषयी सांगणार आहोत. आम्ही सांगणार आहोत ते महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. तोरणमाळ असं या ठिकाणाचे नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात हे पर्यटनस्थळ आहे. निसर्गसौंदर्याने हे ठिकाण नेहमीच पर्यटकांना भुरळ घालते. समुद्रसपाटीपासून 1143 मीटर उंचीवर हे ठिकाण आहे. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, मध्यप्रदेशातील पर्यटकही या शांत व रम्य ठिकाणी गर्दी करतात. तोरणमाळ येथे आता अल्हाददायक अशी गुलाबी थंडी पसरली आहे. पानाफुलांवर दवबिंदू पडले आहेत. हा सर्व नजारा पाहून जणू स्वर्गच पाहत असल्याचा अनुभव तुम्हाला येईल. 


तोरळमाळ हे हिलस्टेशन सातपुडा पर्वतरांगांमधील आहे. महाराष्ट्रातील इतर पर्यटनस्थळांप्रमाणे हे ठिकाण तसे दुर्लक्षितच आहे. खूप कमी जणांना या ठिकाणाबाबत माहिती आहे. त्यामुळंच कदाचित या ठिकाणाचे सौंदर्य टिकून राहिले आहे. सुरुवातीला येथे दळवळणाचे साहित्यही नव्हते. मात्र आता थोड्या सुविधा सुरू झाल्या आहेत. तोरणमाळला पोहोचण्यासाठी तब्बल डोंगराला तब्बल सात फेऱ्या घातल्यानंतर या ठिकाणी पोहोचते. 


तोरणाची झाडे मुबलक प्रमाणात असल्यामुळं या स्थानाला तोरणमाळ हे नाव पडलं. येथून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणे म्हणजे जणू पर्यटकांसाठी पर्वणीच असते. या तोरणमाळला संरक्षित वनाचा दर्जादेखील देण्यात आला आहे. येथे अनेक औषधी आणि बहुपयोगी वनस्पती आढळतात. तोरळमाणसंदर्भात रामायणातीलही एक उल्लेख आझळतो. तोरणमाळ येथे सिताखाई पाँइट आहे. ही एक भव्य दरी असून जवळचा धबधबा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. असं म्हणतात की प्रभू श्रीराम माता सीतासह रथावरुन जात असताना रथाचे चाक या ठिकाणी फसले. त्यामुळं जमिनीत मोठा खड्डा पडला याच खड्ड्याला सीताखाई असं म्हटले जाते. सीताखाई पाँइटवरुन दिसणाऱ्या खोल दऱ्या पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. 


तोरणमाळचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे, यशवंत तलाव. या तलावात बाराही महिने पाणी असते. या तलाव नैसर्गिंक असून येथे विहारासाठी स्वयंचलित बोटींची सेवाही सुरू करण्यात आली आहे. 


तोरणमाळला पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळे


सातपायरी घाट, सिताखाई पाँईट, औषधी वनस्पती उद्यान, लेघापाणी उद्यान व गुफा, कमळ तलाव, सनसेट पाँइट, हिरवेगार डोंगर-दऱ्या. तोरणमाळचा जाण्याचा योग्य काळ हा ऑक्टोबर ते मे महिन्याचा आहे. या काळात येथे खूप जास्त थंडी पडते.


तोरणमाळला कसे जायचे?


नंदुरबार जिल्ह्‍यातील अक्राणी तालुक्यात हे थंड हवेचे ठिकाण आहे. रस्तेमार्गाने धुळ, नंदूरबार आणि शहादा ते तोरणमाळपर्यंतची सरकारी बससेवा देखील आहेत. तसंच, नंदुरबार आणि दोंडाई हे जवळचे रेल्वे स्थानक आहे.


कुठे राहाल?


तोरणमाळ येथे राहण्यासाठी रिसॉर्ट व होम स्टे आहेत. तसंच, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने तोरणमाळ हिल रिसॉर्ट सुरू केले आहे.