मुंबई: राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र अजूनही 11 जिल्ह्यांना दिलासा मिळाला नाही. 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम असणार आहेत.या 25 जिल्ह्यात कोरोनाचा जोर बऱ्यापैकी ओसरला आहे. या जिल्ह्यांमधील 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाची स्थिती ही नियंत्रणात आहे. त्यामुळे या 25 जिल्ह्यांना दिलासा देण्यात आहे.तर याऊलट 11 जिल्ह्यातील कोरोना स्थिती ही फारशी चांगली नाही. या 11 जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यात कोरोना वाढतोय. यामध्ये कोल्हापुरानंतर अहमदनगर तसेच रायगड जिल्ह्याचाही समावेश आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून या 11 जिल्ह्यांनी निर्बंधातून कोणताच दिलासा देण्यात आलेला नाही.


कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये दिवसाला मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. अहमदनगरमध्ये 900हून अधिक रुग्ण दरदिवशी वाढत आहेत. त्यामुळे निर्बंध कायम ठेवण्यावर सरकारचा भर आहे. पुण्यात कोरोनापाठोपाठ आता झिकाचाही रुग्ण आढळल्यानं चिंता वाढली आहे. 


अहमदनगर जिल्ह्यात  ९४३ बाधितांची रुग्ण संख्येत भर पडली आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ही वाढणारी संख्या चिंतेची बाब ठरली आहे. नगर जिल्ह्यात आज 1012 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. 5236 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 


कोरोनाची तिसरी लाट याच महिन्यात येण्याची शक्यता एकीकडे व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे अजूनही 11 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं अनलॉकचे नियम शिथिल करण्यात आले नाहीत. नागरिकांना काळजी घेण्याचं मास्क वापरण्याचं आणि सोशल डिस्टन्सिंगचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 



कोणत्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार?


कोल्हापूर
सांगली
सातारा
पुणे
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
सोलापूर
अहमदनगर
बीड
रायगड
पालघर