Maharashtra Vidhan Parishad Election 2022: महाविकासआघाडीला मोठा धक्का, भाजपचे 5 ही उमेदवार विजयी
Maharashtra Vidhan Parishad Election 2022: महाराष्ट्राच्या विधानपरिषद निवडणुकीचा पुन्हा एकदा धक्कादायक निकाल लागला आहे.
Maharashtra Vidhan Parishad Election 2022 : विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. 10 जागांसाठी एकूण 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे भाजप विरुद्ध महाविकासआघाडी अशी चुरस वाढली होती. निकालात शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2, भाजपचे 5 उमेदवार विजय झाले आहेत. दहावी जागा कोणाला जाणार याबाबत सर्वांनाच उत्सूकता होती.
भाजपच्या उमेदवारांना एकूण 133 मते मिळाले आहेत अशी माहिती भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिली. प्रवीण दरेकर यांना 29, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांना प्रत्येकी 30 तर उमा खापरे यांना 28 मते मिळाली आहेत. प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीची 17 मते मिळाले आहेत.
राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषद निकालात देखील भाजपने पुन्हा एकदा महाविकासआघाडीला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसचे भाई जगताप यांचा पराभव झाला आहे.
कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार विजयी
भाजप - राम शिंदे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, उमा खापरे, प्रसाद लाड यांचा विजय
शिवसेना - सचिन अहिर, आमशा पाडवी यांचा विजय
राष्ट्रवादी - रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे यांचा विजय
काँग्रेस - भाई जगताप यांचा विजय
काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोर यांचा पराभव झाला आहे.