Maharashtra Vidhansabha Election 2024 : लोकसभा (Loksabha election 2024) निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपला हादरा दिल्यानंतर आता महाराष्ट्रातील जनता विधानसभा निवडणकीत नेमका कोणाला कौल देणार याचीच उत्सुता लागली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार असल्याचे संकेत देताच राज्यातील पक्षीय बलाबल आणि निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे प्रकाशात आले. यामध्ये सामान्य मतदारांपासून समाजातील नेमक्या कोणत्या घटकांना केंद्रस्थानी ठेवण्यात येत आहे याचीही कल्पना आली. तत्पूर्वी राज्यात मागील 5 वर्षांमध्ये नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडींनी सातत्यानं राज्यातील स्थिती बदलली यावर नजर टाकणंही तितकंच महत्त्वाचं.


मागील 5 वर्षांमध्ये नेमकं काय घडलं? 


2019 ते 2024 दरम्यान राज्याच्या राजकीय पटलावर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. यामध्ये फडणवीस आणि अजित पवार यांचे शपथविधी आणि राजीनामा, उद्दव ठाकरे यांचा शपथविधी, अजित पवारांचा परतीचा प्रवास आणि पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी, सोबतच नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी, 28 शपथविधी, नाना पटोले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा, राज्यसभा निवडणूक, शिवसेनेचा पराभव, 2022 ची विधान परिषद निवडणूक, शिवसेनेचा तिथंही पराभव, शिंदेंचं आमदारांसह गुवाहटीला जाणं, त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं, फडणवीसांचं उपमुख्यमंत्री येणं, शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदेना मिळणं, उद्धव ठाकरेंच्या वाट्याला मशाल चिन्ह जाणं, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देणं आणि पुन्हा मागे घेणं, अजित पवारांचा राष्ट्रवादीला रामराम करत स्वतंत्र प्रवास, अजित पवारांचा शपथविधी, घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादीचं नाव अजित पवारांच्या वाट्याला जाणं या सर्व घटनांचा समावेश आहे. राहिला मुद्दा महत्त्वाच्या आणि केंद्रस्थानी असणाऱ्या मुद्द्यांचा, तर ते मुद्दे खालीलप्रमाणे... 


मराठवाड्यातील निवडणुकांचे प्रमुख मुद्दे


  • मराठा आरक्षण मराठवाड्यात महत्वाचा मुद्दा असेल..सोबतच ओबीसी समाजाचा विरोध याचीही त्याला जोड असेल

  • मुसळधार पावसाने झालेलं बळीराजाचे नुकसान आणि त्याला न मिळालेली नुकसान भरपाई हा मुद्दा महत्वाचा ठरेल

  • शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या भरमसाठ योजनानंतरही शेतकरी आत्महत्या सुरूच आहे.., सोयाबीन चां न मिळणारा भाव हा मुद्दा महत्वाचा असेल

  • मराठवाड्यातील सिंचनाचा बॅकलॉग आहे, नव्या योजना अखेरच्या टप्प्यात जाहीर झाल्यात मात्र जुनयाचे काय हे महत्त्वाचं असेल

  • लाडकी बहिण त्यातून मराठवाड्यातील सगळ्यात जास्त लाभार्थी हा सरकारचा प्रभावी मुद्दा तर विरोधकांचा काउंटर असेल...

  • बीडमध्ये ओबीसी समाजाच्या घरावर मराठा समाजाकडून झालेले हल्ले आणि त्यानंतर झालेलं राजकारण..

  • बीड railway चे 40 वर्षापासून सुरू असलेलं प्रश्न, संभाजी नगर सोडता इतर ठिकाणी उद्योगांचा वानवा..

  • अशोक चव्हाण यांचा पक्षाला रामराम, त्यानंतर काँग्रेसल झालेला फायदा आणि भाजपला झालेलं नुकसान हा मुद्दा या निवडणुकीत असेल. 

  • मराठवाड्यातील 8 ही जिल्हे चांगले रस्ते मार्गे जोडणे ही एक प्रमुख समस्या असून, निवडणुकीवर यावरही चर्चा होईल. 


विदर्भातील मतदारांच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे


  • राज्यभर मराठा आरक्षणाची आंदोलनं होत असताना मराठयांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करू नये यासाठी विदर्भभर ओबीसी घटकांनी केलेली आंदोलने या निवडणुकीवर प्रभाव टाकणार आहेत. 

  • संत्रा प्रक्रिया- कापूस-सोयाबीन प्रक्रिया उद्योग नाही. कोळसा खाणी- वीज उद्योग असूनही रोजगाराला चालना मिळावी असे उद्योग  कमी आहेत. नागपूरची पंचतारांकित औद्योगिक वसाहत देखील फारसे रोजगार आकर्षित करू शकलेली नाही. 

  • मागील काही वर्षे शेतमालाला भाव, विशेषतः धान व सोयाबीनला मिळणारा अत्यल्प भाव हा देखील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा असेल.

  • ऊस, द्राक्ष यांच्या तुलनेत राज्य शासन कापूस, सोयाबीन धानाकडे मदत देताना दुर्लक्ष करते असेही शेतकऱ्यांचे मत आहे. अशा स्थितीत ग्रामीण भागातील मतदारांना हा मुद्दा देखील कळीचा वाटू शकतो. 

  • विदर्भात सिंचनाची स्थिती फारशी प्रगत नाही. अजूनही या भागात केवळ एक पीक घेतले जाते. MIDC त मोठे उद्योग नाही. रोजगाराच्या संधी नाही. रोजगारानिमित्त विदर्भाबाहेर स्थलांतर मोठे. 


हेसुद्धा वाचा : Election: पक्षात फूट, सत्तासंघर्ष अन्... 2019 मध्ये जिंकलेल्या जागा अन् आता कोणाकडे किती जागा?


विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील प्रमुख मुद्दे 


  • शरद पवारांचा करिष्मा / सहानुभूतीचं राजकारण 

  • निष्ठावंत - बाहेरचे यांच्यातील संभाव्य संघर्ष

  • मराठा - ओबीसी संघर्ष/ धनगर आरक्षण 

  • दलित आणि मुस्लिम मतांचा प्रभाव, शेतमालाचे भाव 

  • भाजपचं फोडाफोडीचं राजकारण आणि अजित पवारांविषयीची नाराजी 

  • जागा वाटपातील संभाव्य तिढा/ अंतर्गत धूसपुस 

  • वाढलेली मतदार संख्या/ नवमतदारांचे प्रमाण 

  • लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना वीजबिल माफी इत्यादी

  • विकास कामं आणि प्रकल्पांना आलेली गती 

  • मनसे, आप, परिवर्तन आघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांचा प्रभाव