Mahavikas Aghadi Seat Sharing Formula: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीबरोबरच महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागावाटपासंदर्भातील वाटाघाटी आणि बैठकांचं सत्र सुरु झालं आहे. असं असतानाच आता महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईमधील जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरल्याचं मानलं जात आहे. विशेष म्हणजे कोणत्या मतदारसंघातून कोणता पक्ष आग्रही आहे याची यादीच समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा किमान मुंबईमधील जागावाटपाचा फॉर्म्युला ढोबळमानाने आकार घेताना दिसत आहे.  मुंबईतील एकूण 36 जागांपैकी सर्वाधिक जागांवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आग्रह ठरल्याचं समजतं. त्याखालोखाल काँग्रेस आणि सर्वात कमी जागांसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी शर्यतीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे मुंबईतील वाटाघाटीमध्ये समाजवादी पक्षासाठीही महाविकास आघाडीकडून एक जागा सोडली जाईल अशी शक्यता आहे.


कोण किती जागांसाठी आग्रही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील 36 पैकी 20 जाग लढण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे. त्याखालोखाल 18 जागांवर काँग्रेस दावा सांगत असून शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकूण 7 जागांवर आग्रही. त्याचप्रमाणे समाजवादी पार्टीला शिवाजीनगर-मानखूर्दची जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. 


पुन्हा बैठक होणार


महाविकास आघाडीमध्ये मुंबईतील काही जागांवरून अद्यापही तिडा कायम असल्याचे समजते. या जागांसंदर्भातील चर्चेसाठी गणेशोत्सवानंतर पुन्हा बैठक होणार आहे.


ठाकरे भाजपाला भिडण्यास तयार


आपलं वर्चस्व असलेल्या जागांवर तिन्ही घटक पक्षांनी दावा सांगितला आहे. मात्र त्यातही विशेष बाब म्हणजे भाजप प्रबळ असलेल्या काही जागांवर कुणीच लढणार नसेल तर ठाकरेंची शिवसेना तिथे लढण्यास उत्सुक असल्याचं त्यांनी इतर दोन घटक पक्षांना कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


नक्की वाचा >> शरद पवारांकडून धनंजय मुडेंचा 'टप्प्यात कार्यक्रम'? परळीत मराठा कार्ड! तगडा उमेदवार सापडला?


'या' 4 जागांसाठी तिन्ही पक्ष अडून


विधानसभेच्या कुर्ला, वर्सोवा, जोगेश्वरी आणि घाटकोपर पश्चिम या 4 जागांसाठी महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे तिन्ही आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचप्रमाणे अणुशक्तीनगरच्या जागेवरून राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष आणि ठाकरेंच्या पक्षात रस्सीखेच दिसून येत आहे.


ठाकरेंची शिवसेना आग्रही असलेल्या 20 जागा कोणत्या?


शिवडी 
भायखळा 
वरळी 
माहीम 
चेंबूर 
भांडुप पश्चिम 
विक्रोळी 
मागाठाणे 
जोगेश्वरी पूर्व 
दिंडोशी
अंधेरी पूर्व 
कुर्ला 
कलिना 
वांद्रे पूर्व 
दहिसर 
वडाळा 
घाटकोपर पश्चिम 
गोरेगाव 
अणुशक्ती नगर  
वर्सोवा 


काँग्रेस आग्रही असलेल्या मुंबईतील 18 जागा कोणत्या?


धारावी 
चांदिवली 
मुंबादेवी 
मालाड पश्चिम 
सायन कोळीवाडा 
कुलाबा 
कांदिवली पूर्व 
अंधेरी पश्चिम 
वर्सोवा 
वांद्रे पश्चिम  
घाटकोपर पश्चिम 
कुर्ला 
भायखळा 
जोगेश्वरी पूर्व 
मलबार हील 
माहीम 
बोरीवली 
चारकोप 


शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आग्रही असलेल्या मुंबईतील 7 जागा कोणत्या?


अणुशक्ती नगर 
घाटकोपर पूर्व 
घाटकोपर पश्चिम 
वर्सोवा  
कुर्ला 
अंधेरी पश्चिम  
दहिसर 


समाजवादी पक्षासाठी सोडली जाणारी जागा - शिवाजीनगर-मानखुर्द