Baramati Results 2024: बारामती अजित पवारांचीच! लोकसभेचा वचपा काढला; विजयी मताधिक्य पाहून भरेल धडकी
Maharashtra Vidhan Sabha Election Baramati Results 2024 Live Updates: बारामतीमधून पवार विरुद्ध पवार असा लोकसभेसारखा संघर्ष पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आणि अजित पवारांनी पूर्ण जोर लावल्याचं चित्र दिसून आलं. बारामती मतदारसंघातील क्षणोक्षणाचे अपडेट्स या ठिकाणी जाणून घ्या...
Maharashtra Vidhan Sabha Election Baramati Results 2024 Live Updates: अजित पवार आणि शरद पवारांच्या पक्षाने प्रतिष्ठेच्या केलेल्या बारामती विधानसभा निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बाजी मारली आहे. अजित पवारांनी आपला पुतण्या युगेंद्र पवारांना पराभूत केलं आहे. 20 फेऱ्यांमध्ये झालेल्या मतमोजणीमध्ये अजित पवारांनी 1 लाख 16 हजार मतांनी युगेंद्र पवारांना धूळ चारली आहे. अजित पवारांना एकूण 1 लाख 96 हजार 640 मतं मिळाली. तर युगेंद्र पवारांना एकूण 80 हजार 458 मतं मिळाली आहेत. हा शरद पवारांच्या पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या विजयाच्या माध्यमातून अजित पवारांनी लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढला आहे.
सहाव्या फेरीनंतर
अजित पवार महायुती - 9685
युगेंद्र पवार मविआ- 3246
सहा फेऱ्यांचे मिळून अजित पवार 27556 मतांनी आघाडीवर आहेत.
चौथ्या फेरीनंतरची आकडेवारी:
चौथ्या फेरीमध्ये बारामतीत अजित पवार 15245 मतांनी आघाडीवर
चौथ्या फेरीत अजित पवार यांना 8287 मते पडली तर युगेंद्र पवार यांना 4213 मते पडली.
एकूण मतं
अजित पवार 35329
यूगेद्र पवार 20084
तिसऱ्या फेरीनंतर अजित पवारांचा लीड 11 हजारांहून अधिक
तिसऱ्या फेरीनंतर मतांची आकडेवारी
अजित पवार मते- 9206
युगेंद्र पवार मते- 5007
तिसऱ्या फेरीअखेर अजित पवारांची 11174 मतांनी आघाडी. (सकाळी 9 वाजून 55 मिनिटं)
पहिल्या फेरीत अजित पवारांची आघाडी
मतमोजणीच्या पहिल्या फेरीतील आकडेवारी हाती आली आहे. अजित पवारांनी पहिल्या फेरीतील मतमोजणीमध्ये 3600 हून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे. बारामती पहिल्या फेरीचे आकडे आले समोर. अजित पवारांना 9291 मतं पडली आहेत. तर युगेंद्र पवारांनी 5668 मिळवली आहे. अजित पवारांनी 3623 मतांची आघाडी घेतली आहे. (सकाळी 8 वाजून 55 मिनिटं)
अजित पवारांनी घेतली आघाडी
पोस्टल मतमोजणीमध्ये मागे पडल्यानंतर ईव्हीएम मतमोजणीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आघाडी मिळवली आहे. EVM मशीनमधून मतमोजणी सुरु झाल्यानंतर अजित पवारांनी आघाडी घेतली आहे. अजित पवारांनी पुतण्या युगेंद्र पवारांविरोधात आघाडी घेतली आहे. (सकाळी 8 वाजून 48 मिनिटं)
अजित पवार मतदानकेंद्रावर पोहोचले
अजित पवार बालक मंदिर या निवडणूक मतदान केंद्रात गेले असून आतमध्ये मतदान निरीक्षकांशी चर्चा करत आहेत. (सकाळी 8 वाजून 35 मिनिटं)
पहिल्या फेरीत 20 ईव्हीएममधून होणार मोजणी
पोस्टल मतमोजणीनंतर बारामतीमध्ये पहिल्या फेरीत 20 ईव्हीएम मशीन मतमोजणीसाठी घेण्यात आल्या आहेत. (सकाळी 8 वाजून 28 मिनिटं)
सुरुवातीपासूनच टेन्शन
मतमोजणी सुरु झाल्यानंतर प्रथम पोस्टल मतं मोजली जातात. याच पोस्टल मतांमध्ये युगेंद्र पवारांनी काका अजित पवारांवर आघाडी मिळवली आहे. विशेष म्हणजे यामुळे या मतदारसंघात सुरुवातीपासूनच टेन्शन असल्याचं दिसत आहे. (सकाळी 8 वाजून 22 मिनिटं)
प्राथमिक कल:
बारामतीमधील पहिले कल हाती आली असून बारातमीधून शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार युगेंद्र पवार आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. युगेंद्र पवार हे त्यांचे काका आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात निवडणूक लढवत आहेत. शरद पवारांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीमध्ये युगेंद्र पवारांसाठी जाहीर सभा घेतली होती. याच दिवशी अजित पवारांनीही सांगता सभा घेतली होती. (सकाळी 8 वाजून 15 मिनिटं)
काका विरुद्ध पुतण्या संघर्ष
मागील सहा टर्मपासून आमदार असलेल्या अजित पवारांना पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच बारामतीमधून घरातूनच आव्हान देण्यात आलं आहे. अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांना शरद पवारांच्या पक्षाने उमेदवारी जाहीर केली आणि पुन्हा या मतदारसंघात लोकसभेप्रमाणे पवार विरुद्ध पवार लढाई होणार हे निश्चित झालं. या निवडणुकीमध्ये नेमकं कोण बाजी मारणार याबद्दल वेगवेगळे तर्क-वितर्क मांडले जात असतानाच मतदारसंघात दोन्ही बाजूने झालेला प्रचारही चांगलाच गाजला.
अजित पवारांनी मतदारसंघातील गावागावांमध्ये जाऊन आपली भूमिका मांडली. तर दुसरीकडे युगेंद्र पवारांनी तरुण कार्यकर्त्यांना हाताशी धरुन प्रचाराचा धडका सुरु ठेवला. शरद पवारांनी निवडणूक प्रचार संपण्याच्या दिवशी युगेंद्र यांच्यासाठी बारामतीमध्ये जाहीर सभा घेतली. त्याच दिवशी अजित पवारांनीही सांगता सभा घेत मतदारांना काम पाहून मतदान करण्याचं आवाहन केलं. भावनिक होऊन मतदान करु नका असा उल्लेख अजित पवारांनी अनेकदा केला. संपूर्ण पवार कुटुंब हे युगेंद्र पवारांचा प्रचार करताना पाहायला मिळालं. थेट नावं घेऊन दोघांनाही कधी एकमेकांवर टीका केली नसली तरी अजित पवार आणि युगेंद्र पवारांची सूचक पद्धतीने एकमेकांवर निशाणा साधल्याचं दिसलं.
शरद पवारांकडून नेतृत्वबदलाची भाषा
आपण आधी बारामतीसाठी काम केलं त्यानंतर मागील 30 वर्षांपासून अजित पवार काम करत आहेत. आता नेतृत्वबदलाची गरज असून युगेंद्रला निवडून द्या, असं आवाहन शरद पवारांकडून केलं गेलं. शरद पवार अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी युगेंद्र यांच्याबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित होते. दोन्हीकडून रंगलेल्या प्रचारामुळे आणि पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार संघर्ष असल्याने या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.