Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Ambegaon Live Updates: दिलीप वळसे पाटील यांनी 1523 मतांनी विजय मिळवला आहे. त्यांना एकूण 1 लाख 6 हजार 888 मतं मिळाली आहेत. देवदत्त निकमांना 1 लाख 5 हजार 365 मतं मिळाली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम महाराष्ट्रातील आंबेगाव मतदारसंघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. या मतदारसंघामधून अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असा थेट संघर्ष पाहायला मिळत आहे. या ठिकाणी पहिल्या पंधराव्या फेरीनंतर अजित पवारांचे उमेदवार दिलीप वळसे-पाटील अवघ्या 3821 मतांनी आघाडीवर आहेत. आंबेगावमधील मतमोजणीचे लाइव्ह अपडेट्स या ठिकाणी पाहा:


11.30 : पंधराव्या फेरीनंतर महायुतीचे दिलीप वळसे पाटील 3821 मतांनी आघाडीवर आहेत.


10.30: दिलीप वळसे पाटील 2850 मतांनी आघाडीवर : नवव्या फेरीनंतर दिलीप वळसे पाटील आता 2850 मतांनी आघाडीवर आहेत. फेरी निहाय आघाडीत बदल होतोय. 8 व्या फेरीत देवदत्त निकमांची आघाडी होती.


9.42: पाचव्या फेरीनंतर दिलीप वळसे पाटील 1600 मतांनी आघाडीवर आहेत.


9.30 : चौथी फेरी अखेर महायुतीचे दिलीप वळसे पाटील 91 मतांनी आघाडीवर आहेत.


9.25 : तिसऱ्या फेरी अखेर दिलीप वळसे पाटील 237 मतांनी आघाडीवर आहेत.


9.05 : महायुती दुसऱ्या फेरी अखेरीस आघाडीवर दिलीप वळसे पाटील 211 मतांनी आघाडीवर आहेत.


8.55 : पाहिली फेऱ्यानंतर दिलीप वळसे पाटलांना 2627 मतं तर देवदत्त निकम यांना 2770 मतं मिळाली आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम 143 मतांनी आघाडीवर आहेत.


8.39 : आंबेगाव विधानसभेत ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात. देवदत्त निकमांची आदिवासी भागात आघाडी. पहिली फेरी सुरू, अगदी अतितटीची लढत. ईव्हीएम मशीननुसार लीड बदलत आहेत.


पवार मैदानात


राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर दिलीप वळसे पाटलांनी अजित पवारांची साथ दिली. दिलीप वळसे पाटील शरद पवारांची साथ सोडल्याचं पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दिलीप वळसे पाटील हे पूर्वी शरद पवारांचे स्वकीय सहाय्यक होते. पवारांनीच त्यांना राजकारणामध्ये आणले. दिलीप वळसे पाटील सलग सातवेळा आमदार म्हणून आंबेगावरमधून निवडून आले आहेत. हा प्रदेश ऊस उत्पादकांचा पट्टा असून या ठिकाणी सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून राजकारणाचा कल दिसून येतो. 


दिलीप वळसे पाटलांचा सहकारीच पवारांनी रिंगणात उतरवला


दिलीप वळसे पाटलांचे एकेकाळचे सहकारी असलेल्या देवदत्त निकमांना निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेत अजित पवारांना शह देण्याचा चंग बांधला आहे. विशेष म्हणजे एकेकाळी ज्याप्रमाणे दिलीप वळसे पाटील शरद पवारांचे निकटवर्तीय होते तसेच देवदत्त निकमही दिलीप वळसे पाटलांचे निकटवर्तीय होते. मात्र आता तेच निवडणुकीत आमने-सामने आलेत.