राज्य सरकार कोट्यवधींचा खर्च करून लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराजांची (Chatrapati Shivaji Maharaj) वाघनखं आणणार आहे. अफजल खान वधावेळी ही वाघनखं वापरली असल्याचा दावा राज्य सरकारने (Maharashtra Government) केलाय.  मात्र प्रत्यक्षात आणली जाणारी वाघनखं महाराजांनी अफजल खानाच्या वधावेळी वापरली असल्याचा कोणताच पुरावा नसल्याचं स्पष्टीकरण लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिलंय. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांनी केलेल्या पत्र व्यवहारात विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने हे स्पष्टीकरण दिलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ती' वाघनखं महाराजांची नाहीत?
इंद्रजीस सावंत यांनी विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमसोबत केलेल्या पत्रव्यवहारामध्ये म्युझियम प्रशासनाने वाघनखं अफजल खानाच्या वधावेळी वापरल्याबाबत अनिश्चितता असल्याचं म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाच्या वधावेळी वापरलेल्या वाघनखांबाबत कोणताही पुरावा नाही. सदर वाघनखे 1971 साली म्युझिअमकडे भेट म्हणून आली असंही पत्रात नमुद करण्यात आलंय. भारतातील विविध ठिकाणांकडून एकूण 6 वाघनखं आली. ही वाघनखे ग्रँट डफ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याच्या परिवाराकडून भेट मिळाली होती. पण  इंग्रज अधिकाऱ्याकडे ही वाघनखे कशी आली याची माहिती नाही. ती वाघनखे 1818 सालच्या दरम्यान त्यांच्याकडे आली.


'ती' वाघनखं साताऱ्यात
छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल वाघनखं साताऱ्यात असल्याचा दावा इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल वाघनखे साताऱ्यातून बाहेर गेल्याची किंवा कोणाला भेट दिल्याचाही पुरावा नसल्याचं इंद्रजीत सावंत यांनी म्हटलंय. 1944 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचीत खरी वाघनखं साताऱ्यात होती. 1945 मध्ये छापण्यात आलेल्या पुस्तकात ती वाघनखं साताऱ्यात असल्याचे पुरावे आहेत. अफझल खान वधासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी वाघनखं वापरली, ती साताऱ्यात छत्रपतींकडे होती, जलमंदिरात देवघरावर ती ठेवण्यात आली होती, असा दावाही इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. राजकारण करायचं तर करा पण छत्रपती शिवाजी महाराजांबाबत खोटी माहिती देऊ नका असं आव्हानही इंद्रजीत सावंत यांनी केलंय.


राज्य सरकारच्या जीआरमध्ये काय?
तर छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत आणण्याबाबत राज्य सरकारने काढलेल्या जीआरमध्ये मात्र ही वाघनखं महाराजांनी अफजल खानाच्या वधावेळी वापरली असल्याचा उल्लेख केलाय. सन 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाच्या भेटीदरम्यान खानाने केलेल्या हल्ल्यास प्रत्यूत्तर म्हणून महाराजांनी वाघनखं वापरून खानाचा केलेला वध, या चित्त थरारक घटनेचा समावेश आहे.  या प्रसंगी छत्रपती शिवाजी महारांनी वापरलेली वाघनखं लंडन इथल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम इथं जतन करण्यात आली आहेत. सदर वाघनखे जनसामान्यांच्या दर्शनाकरिता राज्यास तीन वर्षांकरिता उसनवार तत्वावर देण्यास म्युझियमने संमती कळवली आहे.


आतापर्यंत काय घडमोडी घडल्या?
राज्य सरकारकडून ही वाघनखं आणण्याबाबत ज्या घडामोडी सुरू झाल्या त्याच्या घटनाक्रमावर एख नजर टाकुया..


- 15 एप्रिल 2023 - राज्य सरकारने व्हिक्टोरीया अँड अल्बर्ट म्युझियमशी पत्रव्यवहार सुरू केला


- 1 ऑक्टोबर 2023 - सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला गेले


- 3 ऑक्टोबर 2023 - म्युझीयमचे पदाधिकारी टायस्टम हंट यांच्याशी बैठक झाली


- 3 ऑक्टोबर 2023 - राज्य सरकार आणि म्युझियममध्ये वाघनखं भारतात आणण्याबाबत करार 


- मार्च 2024 मध्ये वाघनखं भारतात येणार अशी घोषणा मुनगंटीवार यांनी केली


- तांत्रिक कारणांमुळे वाघनखं भारतात आणण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली


- त्यानंतर 4 मे 2024 रोजी वाघनखं भारतात येणार होती. 


- मात्र निवडणुका जाहिर झाल्यानं पुन्हा तारीख पुढे ढकलण्यात आली. 


इतिहासकार इंद्रजीत सावंतांच्या या दाव्यामुळं या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय.. याबाबत आता सरकार आणि सातारच्या राजघराण्यानंच पुढाकार घेऊन खुलासा करण्याची गरज आहे.