महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी पडणार? गारठा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो वाचा
Maharashtra Weather News: राज्यात पुन्हा एकदा थंडी परतली आहे. हवामान विभागाने हवामानाचा काय आंदाज वर्तवला आहे, जाणून घेऊयाच.
Maharashtra Weather Update: राज्यात पुन्हा एकदा गारठा वाढला आहे. उत्तरेकडील थंडीच्या वाऱ्यांचे प्रवाह तीव्र झाल्याने थंडीचा कडका वाढला आहे. त्यामुळं राज्यात दोन दिवस गारठा कामय राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात गारठा कायम असला तरी तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.
लक्षद्वीप येथे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून ते आज विरुन जाण्याची शक्यता आहे. दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळं कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. राज्यातही त्याचा परिणाम दिसून येत आहे. राज्यात गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी असल्याचं वर्तवण्यात आलाय. उत्तर भारतातून राज्यात शीतलहरी वेगाने येत आहेत, त्यामुळे राज्यातील बहुतांश भाग गारठू लागला आहे. शुक्रवारी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. धुळ्यात तापमानाचा पार 5 अंशाच्या खाली आला आहे. राज्यात दोन दिवस गारठा कायम राहणार आहे. तरी किमान तापमानात 2 ते 3 अंशाची वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटलं आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील किमान तापमान 9 ते 10 अंशांवर खाली आले होते. थंडीची लाट राज्यात सक्रिय झाली असून, 14 ते 18 डिसेंबर या कालावधीत ही लाट अधिक तीव्र राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह आता मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही आगामी 12 ते 24 तासांत गारठा आणखी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
धुळ्यात थंडीचा प्रकोप
धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये थंडीचा प्रकोप सुरूच आहे. जिल्ह्यात शीतलहरी मुळे तापमानाचा पारा 4.4 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलेला आहे. धुळ्यात तापमानाचा पारा पुन्हा घसरला असल्याने जनजीवन विस्कळीत झालेला आहे. थंडी प्रचंड वाढल्यामुळे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. सहा अंश सेल्सिअस वरना तापमानाचा पारा 4.4 अंश सेल्सिअस वरती येऊन ठेपला आहे. महाबळेश्वर पेक्षा देखील धुळ्यात थंडी वाढली आहे. हाडं गोठवणाऱ्या थंडीचा अनुभव धुळेकर घेत आहेत
परभणीतही थंडीचा कडाका
मागील काही दिवस गायब झालेली थंडी पुन्हा एकदा परभणी जिल्हात सक्रिय झाली आहे. काल परभणीचे तापमान 7.8 अंश सेल्सिअस इतके नोंद झाले आहे. या गुलाबी थंडीचा नागरिक आनंद घेतांना दिसताये. परभणीत नागरिकांची पहाट उशिराने होत असून कपाटातील गरम उबदार कपडे कपाटाबाहेर आले असून शेकोटीचा आधार घेतांना नागरिक दिसून येत आहेत. सदर थंडी गहू आणि हरभरा पिकासाठी लाभदायक मानली जात असून लहान मुले वृद्धांची थंडीपासून काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देतायेत. तर या महिन्यात परभणीचा पारा आणखीन खालावेल असा अंदाज परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविला आहे.