Weather Forecast Maharashtra : राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढणार आहे. त्यामुळे हुडहुडी जाणावणार आहे. (Weather News) हवामान विभागाने राज्यात थंडीचा जोर वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील तापमान आणखी खाली उतरण्याचा अंदाजही आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. (Maharashtra Weather Updates) उत्तरेतून येणाऱ्या वाऱ्याचे प्रमाणात वाढ होणार आहे. (Maharashtra Weather News In Marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईसह राज्यात शीत वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यानं पुन्हा हुडहुडी भरली आहे. बहुतांश ठिकाणी तापमान 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  मुंबईकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. गेल्या आठवड्यापासून मुंबईतलं किमान तापमान 16 ते 18 अंशांदरम्यान नोंदवण्यात येत होतं. मात्र काल तापमानात घसरण होऊन 15 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. 


तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईतलं सरासरी किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी घट झाली असून कमाल तापमानात 4 ते 5 अंशांनी घट झाली आहे. 


राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान


धुळे जिल्ह्याचे  तापमान - 9.6 अंश सेल्सिअस
सातारा - 14.5 अंश सेल्सिअस
महाबळेश्वर - 14.4 अंश सेल्सिअस
पुणे  - 12.3 अंश सेल्सिअस
जळगाव - 12.8 अंश सेल्सिअस
अकोला - 17 अंश सेल्सिअस
निफाड - 9.5 अंश सेल्सिअस
नाशिक - 11 अंश सेल्सिअस
पालघर - 18 अंश सेल्सिअस
अमरावती 14.8 अंश सेल्सिअस
सांगली 15 अंश सेल्सिअस
अमरावती 14.8 अंश सेल्सिअस
धाराशिव 18 अंश सेल्सिअस
परभणी - 12.9 अंश सेल्सिअस


दरम्यान, उत्तर भारतात  सातत्यानं सुरु असणाऱ्या थंडीच्या लाटेचे थेट परिणाम महाराष्ट्रबरोबर (Maharashtra Winter) तर दक्षिण भारतापर्यंत (South India) दिसू लागला आहे. उत्तर भारतात सक्रीय असणाऱ्या या लाटेमुळं हवामानात मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळत आहेत.  


देशाच्या पर्वतीय भागांमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे. काश्मीर (Kashmir) आणि लडाखमधील (Ladakh) पर्वतीय भागांमध्ये सातत्याने तापमान कमी होत आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदानुसार या प्रदेशाच्या मैदानी भागात हिमवृष्टी (snowfall) आणि काही भागांमध्ये पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. 25 जानेवारीपर्यंत अशीच परिस्थिती कायम असेल त्यामुळे हवेत गारवा असणार आहे. तसेच शीत लहरीचा मोठा प्रभाव दिसून येईल.