Maharashtra Weather News : मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसानं राज्यात अद्यापही उसंत घेतलेली नाही. मुंबईपासून पालघर, ठाणे आणि रागयगडमध्येही हेच चित्र असून, शहरासह उपनगरीय भागांमध्येही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. गुरुवारी पावसानं काहीशी उघडीप दिलेली असली तरीही सायंकाळच्या सुमारास पुन्हा एकडा काळे ढग दाटून आले आणि पावसानं पुन्हा सर्वांनाच अडचणीत टाकलं. 


राज्याला परतीच्या पावसाचा दणका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मान्सूननं परतीचा प्रवास सुरु केला असला तरीही राज्याला मात्र याच परतीच्या पावसाचा दणका बसताना दिसत आहे. पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, काही भागांमध्ये पावसाचं प्रमाण अंशत: कमी राहील. परिणामी इतक्यात काही लख्ख सूर्यप्रकाश पाहता येणार नाही, असंच चित्र सध्या स्पष्ट होत आहे. 


रत्नागिरी जिल्ह्यामधील खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पाण्याची पातळी ओलांडली आहे. ज्यामुळं मच्छी मार्केट परिसरामध्ये पुराचे पाणी घुसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असणाऱ्या या नदीनं आता धोका पातळी ओलांडल्यानं प्रशासनही सतर्क झालं आहे. या भागामध्ये सध्या पावसाचं प्रमाण काही अंशी कमी असलं तरी सरीवरचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय ज्यामुळं नदीच्या पाणीपातळीत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. 


हेसुद्धा वाचा : संजय राऊत यांना आधी जेल, नंतर जामीन...विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा राऊत वि. सोमय्या


नाशिक, नागपूरमध्ये काय स्थिती? 


काही दिवस उघडीप दिल्यानंतर आता अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. नाशिकमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालं असून, इथं हवानान खात्याने नाशिकला यलो अलर्ट जारी केला आहे. तर, नागपुरातही मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. पावसामुळे इथं अनेक सखल भागात पाणीच पाणी साचलं असून, इथंही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील बहुतांश भागांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.