Maharashtra Weather News : यंदाच्या वर्षातील शेवटचं हवामान वृत्त; आजचा दिवस बोचऱ्या थंडीचा की अवकाळीचा?
Maharashtra Weather News : जाणून घ्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी राज्यासह देशात कसं असेल हवामान. पाहा सविस्तर हवामान वृत्त.
Maharashtra Weather News : देशासह राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढत असतानाच एकाएकी डिसेंबरच्या उत्तरार्धामध्ये हवामानात बदल झाले आणि पावसाळी ढगांनी महाराष्ट्रात प्रवेश केला. देशाच्या दक्षिण किनारपट्टी क्षेत्रावर सुरू असणाऱ्या कमी दाबाच्या प्रणालीसह उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग मंदावल्यामुळं ही परिस्थिती ओढावल्याचं म्हटलं गेलं. आता मात्र अगदी वर्षाच्या अखेरच्या दिवशी अर्थात 31 डिसेंबर 2024 या दिवशी राज्यावर असणारं पावसाचं सावट दूर झाल्याचं पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्यावरून अवकाळीचे ढग सरले असून, विदर्भासह मध्य आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये गारठा वाढणार आहे. किनारपट्टी क्षेत्रात मात्र तापमानाचा आकडा वाढल्याची नोंद करण्यात येईल. गारपीटसदृश्य पावसानंतर आता राज्यातील विदर्भ क्षेत्रामध्ये तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मात्र दुपारच्या वेळी उष्मा कायम राहणार असून, दिवस मावळतीला जाताना या भागांमध्ये तापमानात घट नोंदवण्यात येईल. इतकंच नव्हे, तर पहाटेच्या वेळी राज्यातील बहुतांश घाट क्षेत्रांवर दाट धुक्याची चादर पाहायला मिळेल असाही अंदाज वर्तवत राज्यातील किमान तापमान 9 ते 10 अंश सेल्सिअस (धुळे) तर, कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस (रत्नागिरी) राहण्याची शक्यता आहे.
हेसुद्धा वाचा : बापरे! ...तर त्सुनामी अटळ? महाराष्ट्रातील 'या' नद्यांचं खोरं खचल्यानं जलप्रलयाचे संकेत
उत्तर भारतात थंडीचा प्रकोप
जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमधील पर्वतीय क्षेत्रांमध्ये प्रचंड हिमवृष्टी होत असून, त्यामुळं या भागातून देशातील मध्य क्षेत्रांकडे वाहणाऱ्या शीतलहरींमुळं मध्य प्रदेश आणि राजस्थानसह गुजरातमध्ये थंडीचा कडाका वाढत असल्याचं स्पष्ट होत आहे. आयएमडीच्या वृत्तानुसार नव्या वर्षाचं स्वागत थंडीनं होणार असलं तरीही प्रत्यक्ष नव्या वर्षात म्हणजेच 4 जानेवारी 2025 रोजी नव्यानं सक्रिय होणाऱ्या पश्चिमी झंझावाताचे देशावर परिणाम होऊन मैदानी क्षेत्रांमध्ये पाऊसधारा आणि पर्वतीय क्षेत्रांमध्ये हिमवृष्टी असं हवामानाचं चित्र पाहायला मिळेल असा