बापरे! ...तर त्सुनामी अटळ? महाराष्ट्रातील 'या' नद्यांचं खोरं खचल्यानं जलप्रलयाचे संकेत

Krishna Godavari Basin : नैसर्गिक आपत्तीचे दूरगामी परिणाम नेमके कोणत्या स्वरुपातील असतात? निरीक्षणातून समोर आली धक्कादायक माहिती...   

सायली पाटील | Updated: Dec 30, 2024, 03:38 PM IST
बापरे! ...तर त्सुनामी अटळ? महाराष्ट्रातील 'या' नद्यांचं खोरं खचल्यानं जलप्रलयाचे संकेत  title=
Shocking Land of Krishna Godavari basin sank 1km inside scientists issued tsunami alert

Krishna Godavari Basin : नैसर्गिक आपत्ती सांगून येत नसली तरीही या आपत्तीचे संकेत कायमच चिंतेत भर टाकून जातात. सध्या असेच संकेत एका निरीक्षणातून समोर आले असून, त्यामुळं नद्यांचं पात्र खचलं असून येत्या काही वर्षांमध्ये परिस्थिती नेमकी किती भीषण होऊ शकतं याविषयीचा इशारा  शास्त्रज्ञांनी दिला आहे. 

गोव्यातील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान (NIO)च्या माहितीनुसार महाराष्ट्रातून वाहणाऱ्या कृष्णा आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये भूस्खलन झालं असून, त्यामुळं समुद्रसपाटीपासून साधारण 950 ते 1.1 किमी अंतरापर्यंत जमीन खचली आहे. ज्यामुळं जलस्त्रोतांच्या स्तरामुळं चिंता वाढण्याचे संकेत आहेत. भूगर्भातील जलसाठ्यांवर या भूस्खलनाचा परिणाम होणार असल्यामुळं त्सुनामीची भीती वाढली आहे. NIO च्या संचालकपदी असणाऱ्या सुनील कुमार सिंह यांनी प्रतिष्ठित वृत्तसमुहाशी संवाद साधताना दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणात भूभाग खचल्यामुळं मोठ्या प्रमाणात पाणी आणि तळाशी असणारा भूखंड विस्थापित होऊन त्सुनामीचा धोका संभवतो. 

बंगालच्या खाडी क्षेत्रामध्येही NIO नं भूस्खलनाचा इशारा देत या प्रक्रियेदरम्यान पाण्याच्या खालून जाणाऱ्या संचार केबल आणि नैसर्गिक तेल साठ्यांसमवेत किनारपट्टी क्षेत्रांमध्ये राहणाऱ्यांनाची मोठा धोका असल्याचं स्पष्ट केलं आहे. गतकाळात बंगालच्या उपसागरामध्ये झालेल्या या घटनेमुळं जवळपास 11 क्यूबिक किमी तळाशी असणारा भूभाग खचून साधारण ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये असणाऱ्या 44 स्विमिंग पूलइतका पाण्याचा लोंढा एकाच वाहत आला. 

हेसुद्धा वाचा : एका मुलीवरुन घात! जिवलग मित्राच्या डोक्यात रॉड घातला; खाली पडल्यानंतरही मारत राहिला; कारण ऐकून कुटुंबीय चक्रावले

 

नदीपात्रासह समुद्रात होणाऱ्या या भूस्खलनामागे अनेक कारणं असून, त्यातील एक महत्त्वाचं कारण आहे, हल्लीचं हेलेन चक्रीवादळ. 2013 मध्ये हे श्रेणी 1 मधील वादळ असल्याचं सांगितलं जातं. याशिवाय 2010 ते 2013 मधील जलप्रलय, 2014 मध्ये बंगालच्या उपसागराला हादरवणारा महाभयंकर भूकंप या कारणांचाही समावेश आहे. भूकंप, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्ती फक्त भूपृष्ठावरच नाही, तर भूपृष्ठाच्या अंतर्गत भागावरही दूरगामी परिणाम करून जातात हेचा या निरीक्षणातून स्पष्ट होत आहे.