ऑगस्ट संपूर्ण महिना आणि सप्टेंबरचे 15 दिवस महाराष्ट्रात पावसाने गैरहजेरी लावली. मात्र आता सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यात मुसळधार पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.  भारतीय हवामान विभागाच्या पुढील चार आठवड्यांच्या विस्तारित श्रेणीच्या अंदाजानुसार 26 सप्टेंबरपासून पुढील 10 ते 12 दिवस मध्य भारताच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता  आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परभणी जिल्ह्यात  सर्वदूर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झालाय, यामुळे सखल भागात पाणी साचले होते,तर गंगाखेड तालुक्यातील तांदुळवाडी या गावात वीज पडली आहे. परभणी जिल्ह्यात आठवडा भरानंतर जोरदार पावसाने दुपारच्या सुमारास हजेरी लावली,मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या इशाऱ्या प्रमाणे आज परभणी शहरासह मानवत सेलू भागात पाऊस झाला,या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते.


21 व 22 सप्टेंबर रोजी राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण गोव्यात २४ सप्टेंबर रोजी तसेच पालघर, ठाणे, रायगड येथे विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात 23 आणि 24 सप्टेंबर रोजी जळगाव, अहमदनगर, सोलापूर तसेच २४ सप्टेंबर रोजी धुळे, पुणे, सातारा, नंदुरबार, नाशिक येथे विजांचा कडकडाट व मेघ गर्जनेसह वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.


पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी पडत आहेत. यामध्येच उन्हाचे चटके, उकाडा वाढल्याने घामाच्या धारा वाहू लागले आहेत. राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने भारतीय हवामान खात्याने यलो अलर्ट जाहीर केला आहे.