मुंबई : राज्याच्या बहुतांश भागात किमान (Maharashtra Weather)  तापमानाचा पारा घसरल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे (Weather Department)  नोंदण्यात आले. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान परभणीत 5.6अंश सेल्सिअस, निफाडमध्ये यंदाच्या मौसमातील सर्वात कमी 8.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय तर गोंदिया येथे 7.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर भारतात पुढील दोन दिवसांत थंडीची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा घसरण्याची शक्‍यता आहे. तसेच, विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्‍यताही वर्तविण्यात आली आहे. 


राज्यात येत्या दोन ते तीन दिवस राज्यातही काही भागांत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात हवामान कोरडे आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी वाढली आहे. यामुळे किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. विदर्भातील काही भागांत कडाक्याची थंडी आहे.


कोरडे हवामान आणि उत्तर भारतातून शीतलहरी या महाराष्ट्राच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजपासून राज्यात कडाक्याची थंडी असेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी वाढणार आहे. यामुळे किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे.