Maharashtra Weather News in Marathi : देशातील वातावरण झपाट्याने बदल आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीटीसह पावसाचा तडाख्याने शेतकरी हवालदिल आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेने सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहेत. हवामान विभागाने मुंबई आणि ठाणेकरांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी केलाय. मराठवाड्यात गारपीटसह पावसाचा मारा होणार आहे. (maharashtra weather update heatwave alert in kokan yellow alert mumbai and thane rain in vidarbha marathwada)


पुढील 48 तास महत्त्वाचे!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आठवड्याचा पहिला दिवस हवामान विभागाने उष्णतेची लाट येणार असल्याचं सांगितलंय. मुंबई, ठाणेसह पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, कोकण, गोव्यात उष्णतेची लाट येणार असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये असं आवाहन हवामान विभागाने केलाय. 



'या' ठिकाणी पावसाचा मारा!


राज्यातील वातावरण विचित्र झालं असून काही ठिकाणी उष्णतेमुळे नागरिक त्रस्त असताना दुसरीकडे अवकाळी पावसानेही त्यांना हैराण केलंय. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.