Maharashtra Weather Update: राज्यात धुवाधांर पाऊस कोसळत आहे. मुंबईतील पावसाचा जोर जरी ओसरला असला तरी घाट माथ्यावर मुसळधार पाऊस होतोय. पुणे, कोल्हापुरात पावसाने थैमान घातलं आहे. पुण्यात कालरात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. तर, कोल्हापूरातही पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदी धोकापातळीच्या जवळ पोहोचली आहे. पुण्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच, शहरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.


पावसाचे लाइव्ह अपडेट पाहण्यासाठी क्लिक करा


उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड आंबेगाव पुणे शिरूर तालुक्याच्या सर्वच भागात रात्री पासून मुसळधार पाऊस. हवामान खात्याने आज रेड अलर्ट दिल्याने पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांकडून आज खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्याच्या पश्चिम घाट माथ्यावरील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अद्याप हि पावसाचा जोर कायम असून गेली २४ तासांपासून  संततधार पाऊस सुरू आहे. डिंभे धरण परिसरात झाला १०४ मिलिमीटर पाऊस झाला त्यामुळं प्रशासनाकडून सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. 


खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग सकाळी 6:00वा. 35574 क्यूसेक्स करण्यात येत आहे. तसेच धरण परिसरात 100 mm  व घाटमाथ्यावर 200 mm पेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे.


कोल्हापूराला पुराचा धोका


 कोल्हापूरची पंचगंगा नदी धोका पातळी जवळ पोहचली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 42 फूट 10 इंच इतकी झाली आहे. पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फूट इतकी आहे. जिल्हयातील राधानगरी धरण 97.11 टक्के इतके तुडुंब भरले आहे, त्यामुळे कोणत्याहीक्षणी धरणाचे दरवाजे उघडू शकतात. पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली तर कोल्हापूर शहरातील काही भागात आणि ग्रामीण भागातील नदी काठच्या गावात पाणी घुसायला सुरुवात होवू शकते. नदीच्या वाढणाऱ्या पाण्यामुळे जिल्ह्यातील अनेक मुख्य मार्ग बंद झाले असून पूर परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. कोल्हापुरातून कोकणाला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे.


रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस


रायगड जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस बरसत आहे. महाडमध्ये सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सावित्री नदीचे पाणी शहरात शिरण्याची शक्यता आहे. नगर पालिकेने भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क केले आहे. पाली येथील अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर पाणी आले आहे. खोपोली वाकण महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून अंबा, सावित्री , कुंडलिका नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ