Maharashtra Rain LIVE Updates: मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्री करणार पाहणी

Maharashtra Rain LIVE Updates:..तर ठाण्यात मुख्यमंत्र्यांविरोधातही लढेन- राज ठाकरेंच्या शिलेदाराचा हुंकार 

Maharashtra Rain LIVE Updates: मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्री करणार पाहणी

Maharashtra Rain Live Updates:  महाडमध्ये सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली, पाणी शहरात शिरण्याची शक्यता

25 Jul 2024, 19:19 वाजता

Live Update : मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्री करणार पाहणी

मुंबई गोवा महामार्गांवर असणाऱ्या खड्यांमुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज बैठक बोलावली होती. 10 ऑगस्ट पर्यत रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. 10 ऑगस्टला मी स्वतः या रस्त्याची पाहणी देखील करणार असं देखील मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी हे खड्डे मुक्त रस्त्यातून प्रवास करणार का हे पाहावे लागणार आहे. 

25 Jul 2024, 18:26 वाजता

पुण्यात आज पावसानं हाहाकार केलाय. खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्यामुळे पुण्यातील सिंहगड रोडवरील नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय. पुणे जिल्ह्यात बचावकार्यासाठी NDRFच्या 3 टीम तैनात करण्यात आल्यायत. एकता नगर परिसरातील सोसायट्या, रस्ते, दुकानं पाण्याखाली गेलेत. नागरिकांच्या छातीपर्यंत याठिकाणी पाणी आहे. पुणे एकता नगरमध्ये बोटीद्वारे बचावकार्य सुरुय. 

25 Jul 2024, 17:23 वाजता

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाने मुंबई, मुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यात पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरीकांनी सतर्क रहावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मंत्रालय नियंत्रण कक्षाची माहिती. 

25 Jul 2024, 16:59 वाजता

मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगाच रांगा

मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. ठाणे- मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनमध्ये वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.
मुसळधार पाऊस आणि त्यात महामार्गावर पडलेले खड्डे यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पालघरवरून मुंबई ठाणेकडे जाणाऱ्या वाहनाच्या तीन ते पाच किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत. 

25 Jul 2024, 16:16 वाजता

Mumbai Rain Update : मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका, 60 लोकल रद्द

मुंबईत सकाळपासून सुरु असलेल्या  मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या 60 लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ही 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरु आहे.

25 Jul 2024, 16:12 वाजता

अलिबागमधील समुद्रात जे एस डब्ल्यू कंपनीचे बार्ज भरकटले

अलिबाग समुद्रात जे एस डब्ल्यु कंपनीचे बार्ज भरकटले आहे. कुलाबा किल्ल्याच्या मागील बाजूस भरकटलेले बार्ज उभे आहे.  इंजिन बंद पडल्याने बार्ज भरकटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तहसीलदार विक्रम पाटील घटनास्थळी पोहोचले आहेत. या बार्जमध्ये 14 खलाशी असल्याची माहिती मिळाली आहे. बार्जमधील सर्व खलाशी सुखरूप आहेत. 

25 Jul 2024, 15:47 वाजता

Rain Live Update : ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपले, कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस? 

ठाणे जिल्ह्यात सकाळपासून एकूण 138 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  तर सर्वाधिक पाऊस हा मुरबाड मध्ये पडला आहे. 

1.ठाणे -  144.6 मिलिमीटर पावसाची नोंद

2.कल्याण - 128.5 मिलिमीटर पावसाची नोंद

3.मुरबाड - 212.8 मिलिमीटर पावसाची नोंद

4.भिवंडी - 112.7 मिलिमीटर पावसाची नोंद

5.शहापुर- 115.5 मिलिमीटर पावसाची नोंद

6.उल्हासनगर- 115.8 मिलिमीटर पावसाची नोंद

7.अंबरनाथ - 119.0 मिलिमीटर पावसाची नोंद

 एकूण पाऊस - 138.1 मिलिमीटर पावसाची नोंद

25 Jul 2024, 15:24 वाजता

सातारा जिल्ह्यात उद्या रेड अलर्ट, जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. सातारा जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

25 Jul 2024, 14:08 वाजता

...तर ठाण्यात मुख्यमंत्र्यांविरोधातही लढेन- राज ठाकरेंच्या शिलेदाराचा हुंकार 

राज ठाकरेंनी आदेश दिला तर ठाण्यात मुख्यमंत्री यांच्या विरोधातही लढेन असा हुंकार मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे.महायुतीला लोकसभेला मिळालेले यश हे आमच्यामुळे मिळालंय असेही ते पुढे म्हणाले. 

25 Jul 2024, 13:02 वाजता

राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा

कोण कुठल्या पक्षात हे काही कळत नाही. राजकीय पक्षांमध्ये न भुतो घमासान होणाराय. काहीजण बाहेरच्या पक्षात जायच्या तयारीत आहेत. रेड कार्पेट घालतो जाण्यासाठी...त्यांचेच काही स्थिर नाही. मी जिल्हावार चार पाच जणांची टीम करून सर्व्हे केला. परत ते आता तुम्हाला भेटतील...त्यांना सांगा सर्व...तिकीट दिले म्हणजे पैसे काढायला मोकळा..अशांना तिकीट देणार नाही.विधानसभा निवडणुकीत मला सत्तेत आपले लोक बसवायचे आहेत हे घडणार म्हणजे घडणार 200 ते 225 जागा आम्ही लढणार आहोत, असे राज ठाकरे म्हणाले.