नाशिकहून योगेश खरेंसह सागर कुलकर्णी, झी २४ तास, मुंबई  : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.  एकनाथ शिंदेंच्या जोरदार बंडानंतर आता काँग्रेसमध्ये बंडाचे वारे वाहतायत. काँग्रेसचा एक बडा नेता काँग्रेसला रामराम करण्याच्या तयारीत आहे. शिवसेना फुटली आता काँग्रेसची बारी? लवकरच महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार पडणार? अशी जोरदार चर्चा राज्यात सुरू झालीय. कारण काँग्रेसचा एक बडा नेता फुटणार अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसचा बडा नेता काँग्रेसमधून फुटण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. ४ माजी मंत्र्यांसह ९ आमदारांना घेऊन हा बडा नेता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. एवढंच नाही, तर शिंदेंच्या मंत्रिमंडळातही या बंडखोर गटाला स्थान मिळेल, असं सांगितलं जातंय. महाराष्ट्र काँग्रेसमधली धुसफूस विधानपरिषद निवडणुकीतच दिसली होती. त्यानंतर काँग्रेसच्या काही माजी मंत्र्यांसह आमदारांचा गट फुटणार असल्याची चर्चा आहे. नेते मात्र काँग्रेस एकसंध असल्याचा दावा करतायत.


राष्ट्रीय काँग्रेसमध्येही काही आलबेल नाही. गुलाम नबी आझाद यांच्या सोडचिठ्ठीनंतर पक्षात ज्येष्ठांना संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा खळबळजनक आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केला होता. तसंच काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेतही जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. पक्षाचे राज्य पातळीवर काम करणारे ज्येष्ठ नेतेही तेवढेच अस्वस्थ आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये बंड होणार का? झालंच तर त्याची व्याप्ती शिंदेंच्या बंडाएवढी असेल का? या बंडाचं नेतृत्व कोण करेल, या चर्चा राज्यात सुरू झाल्यात.


पाहा स्पेशल रिपोर्ट : 



maharashtra will withness one more political earthquake 9 MLAs to become rebel