Maharashtra Winter Session : विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, `या` प्रकरणाची चौकशी करणार
आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर CM Eknath Shinde यांनी केली घोषणा, तर अजित पवार यांचा सरकारवर हल्लाबोल
Maharashtra Winter Session : मुंबई महापालिकेत (Mumbai Municipal Corporation) यापुर्वीच्या काळात औषध खरेदीत चूकीच्या बाबी घडल्या आहेत. तसंच औषध दिरंगाई झाली या सगळ्याची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधानसभेत (Assembly) केली आहे. मुंबई कांदिवली इथल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण महापालिका रुग्णालयातील (Bharatratna Dr babasaheb ambedkar municipal general hospital) सोई सुविधांचा अभाव असल्याकडे लक्ष वेधत भाजपा (BJP) आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी तारांकित प्रश्न उपस्थितीत केला होता.
खरेदी प्रकरणाची चौकशी करणार
आमदार अॅड. आशिष शेलार यांनी या रुग्णालयातील रिक्त पदं तातडीने भरणार का? चुकीची औषध खरेदी आणि औषध दिरंगाई झाली त्याची चौकशी करणार का? असे प्रश्न उपस्थितीत केले. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचे मान्य करुन, रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील अशी ग्वाही दिली.
आशा वर्कर्सची भरती करणार
आमदार अँड आशिष शेलार यांनी केलेल्या सूचने प्रमाणे 5000 स्वच्छता दूत जसे नियुक्त करण्यात येणार आहेत त्याच प्रमाणे 5500 आशा वर्कर्सची (Asha Workers) भरती करण्यात येईल अशी घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी केली. या रुग्णालयाबाबतीत सविस्तर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली तीही मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. दरम्यान, पश्चिम उपनगरातील सेव्हन हिल्स रुग्णालय महापालिकेने ताब्यात घ्यावे अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली. ती मान्य करीत याबाबत महापालिकेला सूचना करण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या चर्चेत आमदार पराग आळवणी, योगेश सागर सहभागी झाले.
विधानसभेत अजित पवार यांचा घणाघात
दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेली, 'व्हाईट बुक' मध्ये नोंद केलेली राज्यातील विकासकामे शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis Government) थांबवू कसं शकतं ? असा सवाल उपस्थित करत विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत सरकारवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडी सरकार काळात मंजूर केलेली विकासकामं महाराष्ट्रातीलंच आहेत, कर्नाटक, गुजरात, तेलंगणातील नाहीत असं अजित पवार यांनी म्हटलं. शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिल्याने राज्यभरातील विकासकामांवर परिणाम झाला आहे, त्यामुळे विकासकामांवरील स्थगिती उठवण्याची मागणी अजित पवार यांनी विधानसभेत केली. सरकारनं सूडबुद्धीनं राज्यभरातील विकासकामे थांबवली, राज्यानं अनेक सरकारं बघितली, पण असं कधी झालं नव्हतं असा आरोपही अजित पवार यांनी केला आहे.