जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमधील रिक्तपदांसाठी सरासरी ६० टक्के मतदान
वर्धा आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध ११ पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता शुक्रवारी मतदान पार पडलं. या निवडणुकीत सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मुंबई : वर्धा आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध ११ पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता शुक्रवारी मतदान पार पडलं. या निवडणुकीत सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागात झालेले मतदान:
हमदापूर (ता. सेलू, जि. वर्धा) - ६५
आनाळा (ता. परंडा, जि. उस्मानाबाद)- ५४
पंचायत समितीच्या निर्वाचक गणात झालेले मतदान:
पिंगुळी (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) - ५३.२९
नगाव (ता. जि. धुळे) - ४७.५६
तुर्काबाद (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) - ४४.५५
संवदगाव (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) - ५९.२३
सगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड) - ५६.५९
मारतळा (ता. लोहा, जि. नांदेड) - ७४
काटी (ता, तुळजापूर, जि. उस्मानाबाद) - ५६.२१
सौंदड (ता. सडक-अर्जुनी, जि. गोंदिया) - ५८.९४
आजंती (ता. हिंगणघाट, जि. वर्धा) - ६५.२७
घुग्घुस -२ (ता. जि. चंद्रपूर) - ३७.८०
मानापूर (ता. आरमोरी, जि. गडचिरोली) - ६७.०५.
एकूण- ६०
या सर्व ठिकाणी शनिवारी म्हणजेच ७ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.