नंदुरबार : देशात कोरोनाव्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. आता महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. या ठिकाणी दिवसाला 400 प्रकरणे बाहेर येत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू आणि लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसत नाहीयत.


नाशिकमध्ये अनोखा नियम 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकमध्ये लोकांनी कमी प्रमाणात बाहेर पडावे यासाठी एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. प्रत्येक व्यक्तीला बाजारात जाताना प्रत्येकाला 5 रुपयांचे तिकीट घ्यावं लागत. हे तिकीट एका तासासाठी वैध असतं. तिकीट घेतलेली व्यक्ती केवळ एक तास बाजारात राहू शकते. जर एखादी व्यक्ती 1 तासापेक्षा जास्त काळ बाजारात राहिली तर त्याला 500 रुपये दंड भरावा लागेल. नाशिक महानगरपालिका हा शुल्क वसूल करते. पोलिस या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे काम करत आहेत.



धुळे जिल्ह्यात 15 एप्रिल 2021 पर्यंत रात्रीचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. दिवसा शासनाच्या नियमानुसार कामकाजाला मुभा असणार आहे. जिल्हाधिकारी संजय यादव यांनी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.


वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाच्या आदेशाची कठोर अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आला आहे. 27 तारखेपासून संचारबंदी लागू केल्यानंतर आता 15 एप्रिलपर्यंत रात्रीच्या लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.