Kolhapur Political News : कोल्हापुरच्या पालकमंत्रीपदाची माळ शिक्षणमंत्री हसन मुश्रीफांच्या (Hasan Mushrif) गळ्यात पडली. वर वर पाहता दीपक केसरकरांची (Deepak Kesarkar) कोल्हापुरातून उचलबांगडी झाल्याचं चित्र दिसत असलं तरी तसं नाहीये. कोल्हापूरचं (Kolhapur News) पालकमंत्रीपद मुश्रीफांकडे देऊन महायुतीनं महाखेळी खेळल्याची चर्चा आहे. पाहुयात काय आहे महायुतीचा मेगाप्लॅन?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपक केसरकरांची उचलबांगडी करत आणि चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil) डावलत कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाची माळ हसन मुश्रीफांच्या गळ्यात पडली. वरवर पाहता अजित पवार (Ajit Pawar) गटाची कोल्हापुरात सरशी होताना दिसली तरी यामागे महायुतीचा मेगाप्लॅन असल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभेची (Loksabha) जागा जिंकण्यासाठीच महायुतीकडून आणि विशेषत: शिंदे गटाकडून ही फिल्डिंग लावण्यात आल्याचं समजतंय.


युती धर्मानुसार कोल्हापूर लोकसभा शिंदे गटाकडे जाणार आहे. कोल्हापूर लोकसभेची जागा निवडून आणण्याची जबाबदारी हसन मुश्रीफांकडे असणार आहे. सतेज पाटलांना रोखण्याची मुश्रीफांकडे ताकद असली तरी काम म्हणावं इतकं सोपं नसेल. मुश्रीफ यांच्या ताकदीचा वापर करण्याची व्यूहरचनाच शिंदे-फडणवीसांनी आखलेली आहे, त्यामुळे याचा फायदा नक्की कोणाला होणार? हे पाहणं महत्तवाचं असेल.


आणखी वाचा - Video : पोटचं पोर गेलं, मिठी मारून आईने हंबरडा फोडला; सुप्रिया सुळे म्हणतात, 'झोपेचे सोंग घेऊन...'


दरम्यान, कोल्हापुरात महायुतीला टक्कर देईल असा चेहरा आताच्या घडीला तरी इंडिया आघाडीकडे नाही. त्यामुळेच मुश्रीफांची ताकद वापरुन कोल्हापूरची जागा आणखी सुरक्षित करण्याची रणनीती आखण्यात आलीय. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफांनी बांधलेली वज्रमूठ संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सतेज पाटलांना रोखायचं असेल तर हसन मुश्रीफांची साथ लागणार हे शिंदे-फडणवीसांनी ओळखलंय. त्यामुळेच कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाची माळ हसन मुश्रीफांच्या गळ्यात घातल्याचं बोललं जातंय.