Raj Thackeray Order To MNS Workers: मुंबईच्या (Mumbai) नेस्को मैदानावर मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) अॅक्टिव मोडवर आल्याचं पहायला मिळतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा (Ratanagiri) येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलंय.


काय म्हणाले Raj Thackeray ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पक्ष बांधणीच्या आड दुसरे पक्ष कुणी असतील तर त्यांना तुडवा आणि पुढे व्हा, मी मुंबईतून फौज फाटा पाठवतो वकिलांची फौज उभी करतो, असं म्हणत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या उत्साहात फुंकार भरली. येत्या काळात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा असा टाइट बांधतो की कुणी हात लावू शकणार नाही, असं देखील राज ठाकरे (Raj Thackeray) यावेळी म्हणाले आहेत.


लांजा इथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना (Lanja Raj Thackrey) राज ठाकरे यांनी कार्यकर्ताना आदेश दिले आहेत. कोकणात (Kokan) संघटनात्मक बांधणीसाठी आलोय. गाव तिथे शाखा काढायची आहे. मनसे कार्यकर्त्यांना (Raj Thackeray Order To MNS Workers) फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना विविध प्रकारचे आमिष दाखवली जात आहेत, असंही राज ठाकरे यांनी मेळाव्यात सांगितलं.


आणखी वाचा - 'बेळगावात घुसून...', महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये म्हणणाऱ्या बोम्मईंना शहाजीपाबापूंचा इशारा!


दरम्यान, फोडाफोडी सुरू असतानाही मनसे कार्यकर्ते  (MNS Workers) पक्षासोबत आहेत त्यांचं कौतूक देखील राज ठाकरेंनी केलंय. तर जानेवारीत पुन्हा कोकणात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आता सिंधुदुर्ग रत्नागिरी इथल्या पदाधिकाऱ्यांना ज्या सूचना केलेल्या आहेत त्या संदर्भात ते काय काम करतात याची पाहणी केली जाणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे.