नाशिक : दर वर्षी महाशिवरात्रीला हर हर महादेवच्या गजरानं दुमदुमणाऱ्या नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरमध्ये भविकांनी गर्दी केलीय. महाशिवरात्री निमित्ताने १२ ज्योतिर्लींगापैकी एक असणा-या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी सकाळपासूनच हजारो भाविकांनी गर्दी केली. 


हजारो भाविकांची गर्दी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामधल्या भीमाशंकरमध्ये महाशिवरात्री निमित्ताने पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी झाली. पहाटे शिवलिंगाची महापूजा आणि अभिषेक करण्यात आला. 


पांडवकालीन मंदिर 


भारतातील बारा ज्योतिर्लिंगा पैकी आठवे ज्योतिर्लिंग असणा-या औंढा नागनाथ इथे महाशिवरात्री निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. औंढा नागनाथमध्ये भारुखनाथांचं पांडवकालीन मंदिर आहे.


हिंदू धर्मात महाशिवरात्रीला मोठं महत्त्व आहे. महाशिवरात्रीनिमित्त देशभर शिव मंदिरात जाऊन भाविक शिवलिंगावर अभिषेक करतात. महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांनी मुंबईतील बाबुलनाथमध्ये दर्शनासाठी गर्दी केलीये. रात्रीपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्यात. पहाटे शिवलिंगाची महापूजा आणि अभिषेक करण्यात आला. 


बाबूलनाथ मंदिरात अभिषेक


बाबूलनाथ मंदिरात अभिषेक करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. दरवर्षी महाशिवरात्रीला याठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. यंदाही भाविकांनी बाबूलनाथ मंदिरात दर्शनासाठी करण्यासाठी चांगलीच गर्दी केली आहे.


दर वर्षी महाशिवरात्रीला हर हर महादेवच्या गजरानं दुमदुमणा-या नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरमध्ये भविकांनी गर्दी केलीय. महाशिवरात्री निमित्ताने १२ ज्योतिर्लींगापैकी एक असणा-या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी सकाळपासूनच हजारो भाविकांनी गर्दी केली.