मुंबई : Electricity may be more expensive in Maharashtra : राज्यातल्या नागरिकांना मोठा शॉक देणारी बातमी आहे. राज्यातली वीज आणखी महाग होण्याची शक्यता आहे. दरवाढीसाठी महावितरणने (Mahavitran Electricity Company) गुरुवारी राज्य विद्युत नियामक आयोगाशी (Maharashtra State Electricity Regulatory Commission) चर्चा केली. यावेळी वीज दरवाढीचा प्रस्तावावर चर्चा झाली. त्यामुळे आता भविष्यात पुन्हा वीज दरवाढ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Electricity in Maharashtra is likely to become more expensive) त्यामुळे याचा परिणाम हा विद्युत बिलावर दिसून येणार आहे. महागाईत आता वीज बिलाचा (Electricity bill) 'शॉक' बसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वीज दरवाढीबाबत आयोगाने महावितरणला याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहे. कोविड काळात लॉकडाऊन आणि संक्रमण यामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले, अशी माहिती महावितरणे सांगितले आहे. तसेच याकाळात महावितरणची थकबाकी वाढली. पण कंपनी वसुली करु शकलेली नाही. कोविड काळात 70 हजार कोटी रुपयांची एकूण थकबाकी होती. आजही यात कमी झालेली नाही, असे महावितरण कंपनीचे म्हणणे आहे.


महावितरण महागड्या वीज खरेदीचा हवाला देत आहे, पण कंपनी नागरिकांकडू अगोदरच इंधन समायोजन शुल्क वसूल करत आहे. मात्र थकबाकी वसूल करण्यात आलेल्या अपयशाचा फटका ग्राहकांना बसणार आहे. दरम्यान, विशेषबाब म्हणजे सरकारकडूनच वीज बिलाची जास्त थकबाकी आहे. पाणीपुरवठा आणि पथदिव्यांची वीज बिलं महावितरणं वसूल केलेली नाहीत. सुमारे 24 कोटी रुपयांच्या पुढे ही थकबाकी असल्याचे समोर आले आहे.