कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : हेरंब आर्टसचे कैलास देसले गेल्या २० वर्षांपासून इकोफ्रेंडली मखर विकतायत. यंदा मात्र त्यांच्याकडच्या इकोफ्रेंडली मखरांना विशेष महत्त्व प्राप्त झालंय. कारण या मखरांसाठी राबलेयत गतीमंद मुलांचे हात...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कैलास देसले गेल्या वीस वर्षांपासून इको फ्रेंडली मखर बनवतात. देसले यांच्याकडे विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य उपलब्ध आहे. पण यावेळचं साहित्य खास आहे. कारण ही इकोफ्रेंडली मखरं बनवलीयत गतिमंद मुलांनी. देसलेंनी दोन महिन्यांपूर्वी गतिमंद मुलांना एकत्र आणलं, आणि त्यांना इकोफ्रेंडली मखर बनवण्याचं प्रशिक्षण दिलं.


काही दिवसांतच या मुलांनी हे सारं काही आत्मसात केलं. या मुलांना रोजगार मिळावा आणि इकोफ्रेंडली मखर पद्धत जोपासली जावी यासाठी आपण या मुलांना या प्रक्रियेत सामावून घेतल्याचं देसले सांगतात. देसलेंकडच्या इकोफ्रेंडली मखरांना परदेशातही प्रचंड मागणी आहे. 


गतिमंद मुलांनी बनवलेली ही इकोफ्रेंडली मखर पाहून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतोय. इकोफ्रेंडली मखरांसाठी गतीमंद मुलांची घेतलेली मदत निश्चितच कौतुकास्पद आहे.