नाशिक : मालेगावजवळ झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा २६ झाला आहे. काल थांबवलेलं रेस्क्यू ऑपरेशन एनडीआरएफनं आज सकाळी पुन्हा सुरू केलं. त्यानंतर एका दोन वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला. त्यानंतर संपूर्ण विहिरीचं पाणी उपसून एनडीआरएफच्या जवानांनी संपूर्ण कड्याकपाऱ्यांचा शोध घेतला. त्यानंतर हे ऑपरेशन थांबवण्यात आलं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालेगाव-देवळा रस्त्यावर एसटी बस आणि ऍपे रिक्षा यांच्यात हा भीषण अपघात झाला. अपघातात दोन्ही वाहनं विहिरीत पडली. या अपघातात २६ जणांचा मृत्यू, तर ३१ जण जखमी झाले आहे. 


जखमींवर मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रूपये देण्याची घोषणा एसटी महामंडळाकडून करण्यात आली आहे.