जळगाव : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसनं सुरू केलेली जनसंघर्ष यात्रा जळगाव जिल्ह्यातील फैजपूरमध्ये पोहोचलीय. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचे आवाहन केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९३६ मध्ये महात्मा गांधींच्या उपस्थितीत फैजपूरमध्येच अखिल भारतीय काँग्रेसचं अधिवेशन पार पडलं होतं. त्याच फैजपूरमध्ये सरकारविरोधात एल्गार पुकारण्याचा संकल्प काँग्रेस नेत्यांनी जाहीर सभेतून केला.


इंदिरा गांधी, राजीव गांधींनी देशासाठी जीव दिला... पण भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाच्या घरातला कुत्रा तरी मेला का, असा सवाल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. मतांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव भाजपवाले घेतात. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात आंबेडकरांचे फोटो का नसतात, असा सवाल खरगेंनी केला. तर भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचं आवाहन अन्य काँग्रेस नेत्यांनी यावेळी केलं.