वैभव बालकुंदे, झी मिडीयाः नात्यात असलेल्या महिलेचे गावातीलच एका व्यक्तीसोबत सुरू असलेले अनैतिक संबंध पाहिले. या कारणावरुन दोघांनी तरुणाचा जीव गेल्याचा प्रकार समोर आला आहे. लातूर जिल्ह्यातील चिद्रेवाडी जिल्ह्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी सदर महिलेच्या आणि तिच्या प्रियकराच्या मुसक्या आवळल्या आहेत. अथक परिश्रमानंतर अवघ्या ४८ तासांत खुनाचे गुढ उकलण्यात वाढवणा (बु) पोलिसांना यश आले आहे.


नग्नावस्थेत सापडला मृतदेह


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या संदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहिती वरून चाकुर तालुक्यातील चिद्रेवाडी येथील गणेश गोपीनाथ उस्तूर्गे या २८ वर्षीय तरुणाचा मंगळवारी गावालगतच असलेल्या शिवारात नग्नावस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्याचा गळा आवळल्याच्या आणि गुप्तांगावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या होत्या. तरुणाची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. मात्र, जवळपास कोणताच पुरावा सापडत नसल्याने काहीच ठोस सांगता येत नव्हते. पोलिसांनी गावकऱ्यांची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवित अवघ्या ४८ तासांत तपास करत एका महिलेसह दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.


या खुनाच्या प्रकरणाला अनैतिक संबंधाचा संशय पोलिसांना होता. त्यामुळे पहिल्यांदा मयत गणेश याचे कोणाशी अनैतिक संबंध होते का? याचा तपास पोलिसांकडून करण्यात आला. मात्र तपासात अशी कोणतीही बाब समोर आली नाही. त्यामुळं तपासासाठी अडचणी निर्माण होत होत्या.  अशातच हत्येपूर्वी गणेश घरातून शेताकडे निघाला होता, अशी माहिती घरच्यांनी दिली. हाच धागा पकडत पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली आणि अवघ्या ४८ तासांत दोघांना पकडण्यात यश आले. 


तुमचं पॅनकार्ड दुसरं कोणी वापरत तर नाहीये ना?; अशी खात्री करा अन् इथे करा तक्रार


नको त्या अवस्थेतील व्हिडिओ शूट केला


सोमवारी रात्री जेवण केल्यानंतर गणेश हा गावालगत असलेल्या त्याच्या शेतात गेला होता. त्यावेळी प्रदीप आणी एक महिला त्यांच्या शेतात आली होती. ते दोघे शेतात आल्याची कुणकुण लागताच गणेश तिथे गेला. मात्र, तिथे पोहोचताच दोघांनाही आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. त्यानंतर त्याने स्वतःच्या मोबाईमध्ये या दोघांचा 'त्या' अवस्थेतील व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. 


आपला व्हिडिओ कोणीतरी काढत असल्याची बाब प्रदीपच्या लक्षात येताच गणेश आणि त्याच्यात झटापट झाली आणि प्रदीपने त्याच्या गुप्तांगावर गंभीर वार केला आणि यातच तो मयत झाला. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्या अंगातील कपडे काढून मृतदेह अन्यत्र ओढत नेला. परंतु कोणीतरी पाहिल या भीतीने मृतदेह तिथेच टाकून प्रदीप आणि सदर महिला दोघेही निघून गेले. आता पोलिसांनी प्रदीप करडखेले याच्यासह सदर महिलेला ताब्यात घेतले आहे.


तुमची साडेसाती सुरू आहे?; शनि जयंतीचा मुहूर्त आहे तुमच्यासाठी खास, या गोष्टी करा दान