Shani Jayanti 2023 Upay: शनिदेव (Shani dev) हे सर्वात क्रोधित देवता म्हणून मानले जातात. शनिदेवाला न्यायाची देवतादेखील म्हटलं जाते. असं म्हणतात मानवाच्या पाप-पुण्याचा हिशोब शनिदेवांकडे असतो. ते जितक्या लवकर क्रोधित होतात तितक्या लवकरच प्रसन्नदेखील होतात. शनिदेवाची महिमा अपरंपार आहे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक शनिवारी पूजा करण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रात आहे. मात्र संपूर्ण वर्षात एक दिवस खास असतो. ज्या दिवशी शनिदेवाची भक्ती केल्यास निश्चित फळ मिळेल. ज्या दिवशी शनि देवाचा जन्म झाला तो दिवस शनि जयंती (Shani Jayanti) म्हणून मानला जातो. या दिवशी तुम्ही मनोकामे प्रार्थना केल्यास तुमच्यावर शनिदेव प्रसन्न होतात, अशी अख्यायिका सांगितली जाते.
शनि जयंती ही वैशाख महिन्यात येते यंदा १९ मे म्हणजेच उद्या शुक्रवारी शनि जयंती साजरी करण्यात येते. या दिवशी शनिदेवाची मनोभावे पूजा केल्यास संपूर्ण वर्षभराचा आशीर्वाद मिळेल. खासकरुन ज्यालोकांची शनिची साडेसाती सुरू आहे. त्यांच्यासाठी शनि जयंतीचा दिवस खास आहे. या लोकांनी शनि मंदिरात जाऊन देवाची मनोभावे पुजा करावी.
जो लोक नेहमी गरीबांची मदत करतात व गरजुच्या मदतीसाठी धावतात अशा लोकांवर शनिदेवाची नेहमीच कृपादृष्टी असते. त्याचबरोबर, ज्यांची कर्म चांगली आहेत त्यांच्यावर कधीच शनिदेव आपली वक्रदृष्टी टाकत नाहीत.
शेजाऱ्याची आईवर होती वाकडी नजर, मुलाला खबर लागली, घडवली जन्माची अद्दल
शनि देवाला काळी गाय, काळा श्वान आणि कावळ्याची सेवा करणारे लोक अधिक पसंत असतात. त्याचबरोबर शनि जयंतीला तिळाचे तेल, कच्चा कोळसा, लोखंडाचे भांडे, काळे वस्त्र, काळी छत्री, काळे तिळ, काळे उडद यासारख्या वस्तू शनिदेवाला दान करतात.
भगवान शिव आणि हनुमानाची पूजा करणाऱ्या लोकांनाही शनि देव नाराज करत नाही. प्रत्येक शनिवारी पिंपळ आणि शमीच्या झाडाची पूजा करण्याने आणि सात मुखी रुद्राक्ष परिधान केल्यास शनि दोष कमी होतो. तसंच, साडेसातीच्या काळात जास्त अडचणींचा सामना करावा लागत नाही.
मंगलाष्टका सुरू होत्या, इतक्यात नातेवाईकांनी नवरीला असं काही सांगितले की तिने थेट लग्नच मोडले
शमीचे झाड शनिदेवाला अधिक प्रिय आहे. घरात शमिचे झाड लावल्याने शनि देव प्रसन्न होतात. शमीच्या झाडात शनिदेवांचा वास असतो असं मानलं जातं. या झाडाची पूजा केल्यास अडचणी कमी होतात, असंही सांगितले जाते. हे झाड पापक्षालन असून यात घरातील नकारात्मकता दूर करण्याची शक्ती असते, अशीही अख्यायिका मानली जाते आहे.