पुणे : ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे रुबी हॉलमध्ये निधन झाले. वैकुंठ स्मशानभूमीत आज दुपारी अंत्यसंस्कार  होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगेश तेंडुलकर हे एक मराठी हास्य-व्यंग्यचित्रकार म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांनी काही विनोदी पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांचे अनेक ललित लेख नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांची अनेक प्रदर्शने भरलीत आहेत. ते व्याख्यातेही होते.


त्यांची भुईचक्र, संडे मूड पुस्तके होते. संडे मूड या पुस्तकात जवळपास ५३ लेख आणि तेवढीच व्यंगचित्रे प्रसिद्ध करण्यात आलीत. त्यांनी वयाची पंचाहत्तरी ओलांडली होती.  वृत्तपत्र, नियतकालिकांमधून व्यंगचित्र प्रकाशित होतं. आपल्या कुंचल्यातून सामाजिक समस्यांना तेंडूलकरांनी नेहमीच वाचा फोडली.  सामाजिक कामातही ते नेहमी हिरीरीनं सहभागी होते असत.