चेतन कोळस, झी मीडिया, नाशिक : भारतातील आंब्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भारतामध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते आणि  चवीलाही तेवढेच उत्कृष्ट असतात. त्यामुळेच भारतीय आंब्यांना जगभरात पसंत केले जाते. जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा कोकणचा हापूस आंब्याची परदेशवारीही 12 एप्रिलपासून निफाड तालुक्यातील लासलगावमार्गे सुरु झाली आहे. या हंगामात 360 मॅट्रिक टन आंब्यावर विक्री प्रक्रिया करुन अमेरिकेला रवाना झाले आहेत. 2019च्या तुलनेत आंबा निर्यातीत 325 टनने घट झाल्याचे दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशात शेतीमालाच्या निर्यातीवर परिणाम झाला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने फळांचा राजा म्हणून ओळख असलेला कोकणचा हापूस आंब्याची यशस्वी निर्यात करण्यात आली. लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून अल्फान्सो, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत,हापूस या जातीच्या आंब्यावर  प्रक्रिया होऊन न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजिल्स, शिकागो याठिकाणी आंबा निर्यात झाली आहे. 


कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने फळांचा राजा म्हणून ओळख असलेला कोकणचा हापूस आंब्याची यशस्वी निर्यात झाली.360 मॅट्रिक टन आंबे अमेरिकेला रवाना झाली सन 2019च्या तुलनेत आंबा निर्यातीत 325 टनने  घट झाल्याचे दिसत आहे. यंदा ऑस्ट्रेलियामध्ये आंबा निर्यात न झाल्याने निर्यातीत घट झाल्याचे दिसत आहे.भारतात विविध प्रकारच्या आंब्याच्या जाती असून, त्यांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. इतर देशातही त्यांची निर्यात होते. या निर्यातीत विचार केला, तर यंदा लासलगावमार्गे झालेली सगळी निर्यात एकट्या अमेरिकेत झाली आहे.