Maratha Andolan : मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी तातडीने उपोषण मागे घ्यावं तसच मराठा आरक्षणासंदर्भात एक समिती गठीत करून त्याचं नेतृत्त्व अजित पवारांनी (Ajit Pawar) करावं असा ठराव सर्वपक्षीय  बैठकीत घेण्यात आलाय. तब्बल अडीच तासांपासून मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीत खल करण्यात आला. या बैठकीत जरांगे-पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावं हीच राज्यसरकारची भूमिका असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. तसंच अंतरवाली सराटीत आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या तीन मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (CM Eknath Shinde) यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'दबावाल बळी पडणार नाही'
पण मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहेत. समितीत आमचं कोणीही मागे जाणार नाही, सरकारनेच त्यांच्या समितीत त्यांना हवं त्यांना टाकवं आणि मराठा समाजाला न्याय द्यावा, काहीही करा पण मराठा समाजाला आरक्षण द्या, समितीत जाण्याचा मोह आम्हाला नाही.  सरसकट जर गुन्हे मागे घेतले असतील तर सरकारचं स्वागत करतो. मी कोणालाही घाबरत नाही, कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. 


संभाजीराजे छत्रपती यांचा सवाल
मनोज जरांगेंच्या उपोषणापूर्वी सर्वपक्षीय बैठक का घेतली नाही असा सवाल  माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला. कुणबी प्रमाणपत्र कायद्यात बसत असेल तरच द्या आणि शक्य नसेर तर तसं स्पष्ट सांगा असा सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिलाय. आपण  बैठकीला येणार नव्हतो . मात्र समाजाच्या भावना मांडयच्या होत्या त्यामुळे आपण हजेरी लावली. तसंच बैठकीच्या सुरूवातीलाच आपण मुद्दे मांडून बाहेर पडल्याचं त्यांनी सांगितलं. 


उपचार घेण्यास नकार
मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास पुन्हा एकदा नकार दिलाय. त्यामुळे त्यांच्या तपासणीसाठी आलेलं पथक तपासणी न करताच माघारी फिरलंय. सोमवारी दिवसभरात 3 वेळा डॉक्टरांची 2 पथकं त्यांची तपासणी करण्यासाठी  आली होती. मात्र जोवर आपली मागणी मान्य होत नाही तोवर तपासणी करून घेणार नाही असा पवित्रा मनोज जरांगेंनी घेतलाय.  मराठा आरक्षण हाच माझ्यावरचा उपचार आहे याचा पुनरूच्चार जरांगे यांनी केलाय. 


पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
मराठवाड्यातल्या मराठ्यांना मागासवर्गीय आरक्षण देतंय तर पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडे मारलंय? अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधलाय. तसंच पक्षांतरामुळे अजित पवारांना विसर पडला असेल, असा टोलाही पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवारांना लगावलाय. तर मनोज जरांगेंनी पृथ्वीराज चव्हाणांना उत्तर दिलंय. तुमच्याकडे निजाम नव्हता तर घेऊन जायला हवं होतं असा टोला जरांगेंनी लगावालय.